लवकरच ७५ रूपयांचे नाणे चलनात येणार आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे प्रथम तिरंगा फडकावल्याच्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून सरकार ७५ रूपयांचे नाणे चलनात आणनार आहे. यासंदर्भातील नोटिफिकेशन अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे.  या नव्या ७५ रूपयांच्या नाण्यावर सेल्युलर जेलच्या मागे तिरंग्याला सलामी देत असलेल्या नेताजींचे चित्र असेल. तसेच नाण्यावर देवनागरी आणि इंग्रजीत ‘प्रथम ध्वजारोहण दिवस’ असे लिहलेले असेल.

चलनात येणारे ७५ रूपयांच्या नाण्याचे वजन ३५ ग्रॅम आहे. यामध्ये ५० टक्के चांदी तर ४० टक्के तांबे असणार आहे. तर निकेल आणि जस्त धातूचे प्रमाण प्रत्येकी पाच टक्के असणार आहे.