News Flash

मुलीला त्रास देणाऱ्या आरएसएस कार्यकर्त्याची पित्याकडून हत्या

याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे

(सांकेतिक छायाचित्र)

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आरोपी कवरपाल याने आपण आपला मुलगा मोनू आणि भाऊ प्रमोद यांच्या मदतीने हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पंकज आपल्या मुलीला त्रास देत होता. यामुळेच आपण हत्या केल्याचा त्याचा दावा आहे.

शनिवारी पंकजचा मृतदेह पोलिसांनी सापडला होता. पोलिसांनी कारवाई करत कवरपाल आणि त्याच्या मुलाला हत्येच्या आऱोपाखाली अटक केली आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यार जप्त करण्यात आलं असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधीक्षक अभिषेक यादव यांनी दिली आहे. तिसरा आऱोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 11:46 am

Web Title: rss activist murderd uttar pradesh muzaffarnagar sgy 87
Next Stories
1 अयोध्या प्रकरणाला नवे वळण; दोन्ही पक्षकार पुन्हा कोर्टाबाहेर तडजोडीच्या विचारात
2 पाकिस्तानचं काही खरं नाही… भारताला मिळाले ‘बिल्डींग ब्लास्टर’ बॉम्ब
3 हो हे खरंय! ट्रक मालकाकडून केली साडेसहा लाखांची दंडवसुली
Just Now!
X