करोनाची निर्मिती चीनमध्ये झाल्याची शंका आहे. पण या काळात चीनने आपल्या सीमेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. आपल्यासोबतच अन्य देशांशीही चीनने युद्धजन्य स्थिती निर्माण केली आहे. तो त्यांचा स्वभाव आहे. त्यांचा स्वभाव विस्तारवाद असल्याचं सर्वांना माहित आहे. चीनने तैवान, भारत, व्हऐतनाम, जपान आणि अमेरिकासह एकत्रच शत्रुत्व केलं. पण, लडाखमध्ये भारतीय सैन्यानं चीनला जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यामुळं सामरिक आणि आर्थिक बाबींमध्ये चीनला जोरदार धक्का बसला आहे. अन्य देशांनीही चीनला फैलावर घेतलं आहे. चीनचा विस्तारवाद लक्षात घेता तो पुढे काय करेल माहिती नाही. त्यामुळे भारताला चीनपेक्षा आधिक शक्तीशाली व्हावं लागेल, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. ते संघाच्या विजयादशमी सोहळ्यात बोलत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज, रविवारी नागपुरात पार पडतो आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विजयादशमी सोहळ्यालाला पहिल्यांदाच स्वयंसेवकांच्या कवायती नाही. त्यामुळे आरएसएसच्या पारंपारिक दसऱ्या सोहळा यंदा खंड पडला आहे. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हडगेवार सभागृहात शस्त्रपूजन केलं, त्यानंतर उत्सवाला सुरुवात झाली. फक्त मोजक्याज ५० स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरु आहे.

यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी चीला चांगलेच फैलावर घेतलं. शिवाय भारताला आधिक शक्तीशाली व्हायची गरज आहे असेही म्हटले. ते म्हणाले की, सामरिक, आर्थिक, औद्योगिक बाबींमध्ये आपण चीन पेक्षा आधिक सक्षम होणं गरजेचं आहे. नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका या शेजारी राष्ट्रांशी संबंध सुधारण्याची, मित्रता टिकवण्याची गरज आहे. मतभेत होतात. ते दूर करुन चीनला टक्कर द्यायची असेल तर शेजारी राष्ट्रांशी संबंध चांगले ठेवणं गरजेचं आहे. मित्रता टिकवतो म्हणजे आम्ही कमजोर नाही. आपली मित्रता कुणाला कमजोरी वाटत असेल, अशा राष्ट्रांना आपण जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.


पहिल्यांदाच कमी लोकांच्या उपस्थित विजयादशमीचा कार्यक्रम घेण्यात आला. यंदा संपूर्ण जगावर करोनाचं संकट आलं आहे. या संकटकाळात संपूर्ण देश एक झाला. सर्वांनी मिळून करोनासोबत लढा दिला आहे. करोनामुळे रोजगार सोडून गावी गेलेला मजूर परत येत आहे. परतलेल्यांना पुन्हा रोजगार आहेच असं नाही. गरज पडल्यास त्यांना आता नवीन रोजगार शोधावा लागेल. २०१९ मध्ये कलम ३७० हटवण्यात आलं शिवाय ९ नोव्हेंबर रोजी न्यायालयानं राम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय दिला. संपूर्ण देशानं हे निर्णय संयमानं स्वीकारले. याशिवाय सीएएचा देशातील कुठल्याही नागरिकाला धोका नाही, असे भागवत म्हणाले. सीएएविरोधी देशात निदर्शनं झाली. निषेध नोंदवण्यात आला. त्यामुळे देशात तणाव निर्माण झाला. पण सीएएचा देशातील कोणत्याही नागरिकाला धोका नाही. सीएएवर अधिक चर्चा होण्यापूर्वी, यावर्षी देशावर करोनावर संकट आलं, असे भागवत म्हणाले.