20 November 2017

News Flash

मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबद्दल भागवतांची आळी मिळी गुपचिळी!

नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र आहेत, असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत

अलाहाबाद | Updated: February 7, 2013 1:38 AM

नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र आहेत, असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदींच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीबद्दल कोणतेही भाष्य करण्यास गुरुवारी नकार दिला.
कुंभमेळ्यात होणाऱया धर्मसंसदेत सहभागी होण्यासाठी भागवत अलाहाबाद येथे आले आहेत. भारतीय जनता पक्षाने मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी द्यावी का, या प्रश्नावर भागवत यांनी, मी काही राजकीय व्यक्ती नाही आणि हा काही राजकीय दौरा नाही, हे उत्तर दिले.
मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी द्यावी, यासाठी भाजपमधील काही नेते प्रयत्नशील आहेत. काही हिंदूत्त्ववादी संघटनांनीही मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यापार्श्वभूमीवर संघाची भूमिका जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी भागवत यांना याबद्दल प्रश्न विचारले.

First Published on February 7, 2013 1:38 am

Web Title: rss chief mohan bhagwat did not say anything on narendra modis candidature
टॅग Mohan Bhagwat