News Flash

सरसंघचालक मोहन भागवतांनी घेतली राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची सदिच्छा भेट

मोहन भागवत यांचे नावही राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत होते.

मोहन भागवत यांचे नावही राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत होते. परंतु, भागवत यांनी स्वत: या चर्चेला पुर्णविराम देत आपल्याला राष्ट्रपतीपदासाठी इच्छुक नसल्याचे म्हटले होते.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (आरएसएस) प्रमूख मोहन भागवत यांनी शुक्रवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. ही शिष्टाचार भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यमान राष्ट्रपती मुखर्जी यांचा कार्यकाल दि. २४ जुलै रोजी संपणार आहे. निवडणूक आयोगाने दि. १७ जुलै रोजी राष्ट्रपती निवडणुकीची घोषणा केली आहे. २० जुलै रोजी निवडणुकीचे निकाल समोर येतील. राष्ट्रपती पदाचा उमेदवार सर्वसंमतीने ठरावा यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. परंतु, या दरम्यान उमेदवाराच्या नावाबाबत काही माहिती मिळू शकली नाही. जोपर्यंत सरकार राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचे नाव पुढे करत नाही. तोपर्यंत पाठिंब्याबाबत काहीच बोलणार नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मोहन भागवत यांचे नावही राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत होते. परंतु, भागवत यांनी स्वत: या चर्चेला पुर्णविराम देत आपल्याला राष्ट्रपतीपदासाठी इच्छुक नसल्याचे म्हटले होते. शिवसेनेने भागवत हेच राष्ट्रपतीपदासाठी योग्य असल्याचे वारंवार म्हटले होते. भारताला हिंदू राष्ट्र बनवणे हा प्राथमिक उद्देश असल्याचे सांगत भागवत हेच पुढील राष्ट्रपती बनले पाहिजेत असे शिवसेना पक्ष प्रमूख उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.

त्याचबरोबर काँग्रेसचे कर्नाटकातील मुस्लिम नेते सी. के. जाफर शरीफ यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवत यांच्या नावाला पाठिंबा दिला होता. भागवतांच्या देशभक्तीवर आणि त्यांच्या घटनेप्रतीच्या प्रतिबद्धतेवर शंका घेत येत नसल्याचे म्हटले होते. पण भागवत यांनी या सर्व शक्यता फेटाळत आपल्याला यासाठी प्रस्ताव आला तरी आपण स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 4:51 pm

Web Title: rss chief mohan bhagwat meet to president pranab mukherjee
Next Stories
1 सीमेवर पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद
2 Viral: मनोरुग्ण महिलेवर ‘अल्ला’, ‘जय श्रीराम’ बोलण्याची सक्ती; पाईपने मारहाण
3 नवीन बँक खाते, ५० हजार रुपयांच्या बँक व्यवहारांसाठीही ‘आधार’ बंधनकारक!
Just Now!
X