पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जशास तसे उत्तर द्या असे आवाहन आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. आम्ही आत्तापर्यंत खूप झेलले आजचा प्रसंगही तसाच आहे. मागच्या वेळी जसे उत्तर दिले तसेच उत्तर आत्ताही देण्याची गरज आहे, असे म्हणत मोहन भागवत यांनी पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. मोदी सरकारने या हल्ल्याला जशास तसे उत्तर दिलेच पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. नागपुरात झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

पुलवामा या ठिकाणी CRPF च्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आत्तापर्यंत चाळीस जवान शहीद झाले आहेत. अनेक जवान जखमी झाले आहेत. पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक घडवून आणा आणि चोख प्रत्युत्तर द्या अशीही मागणी होऊ लागली आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर घडणाऱ्या प्रत्येक हालचालींवर अजित डोवल यांची नजर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अजित डोवाल यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि आयबीचे संचालक या दोघांनीही इथे काय घडामोडी घडल्या याबाबत अजित डोवल यांच्याशी चर्चा केली. आता सरसंघचालक मोहन भागवत यांनीही जशास तसे उत्तर द्या अशी मागणी केली आहे