05 March 2021

News Flash

राष्ट्रविरोधी शक्तींना देशातील शांतता भंग करायची आहे: मोहन भागवत

केवळ भारताकडेच या राष्ट्रविरोधी शक्तींचा सामना करण्याची आणि त्यांना पराभूत करण्याची क्षमता आहे.

राष्ट्रविरोधी शक्ती देशातील शांतता आणि सद्गुणांना नष्ट करण्याच्या दिशेने काम करत असल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. (छायाचित्र: एएनआय)

राष्ट्रविरोधी शक्ती देशातील शांतता आणि सद्गुणांना नष्ट करण्याच्या दिशेने काम करत असल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. ७० व्या प्रजासत्ताक दिवसानिमित्त उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे जनतेला संबोधित करताना ते बोलत होते.

ते म्हणाले, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाले आहेत. आपण पुढे जात आहोत. पण काही शक्ती अशा आहेत की, त्यांना शांतता आणि सद्गुण उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात सध्या अशा पद्धतीच्याच शक्ती आहेत.

७० वर्षे झाले, आपण पुढे जात आहोत. पण जगात जर शांतता निर्माण झाली तर त्यांचे स्वार्थी दुकान बंद होईल. देश समृद्ध होऊ नये म्हणून असे लोक प्रयत्न करत आहेत. असा प्रयत्न करणाऱ्याच शक्ती जगात, आपल्या देशात कार्यरत आहेत.

केवळ भारताकडेच या राष्ट्रविरोधी शक्तींचा सामना करण्याची आणि त्यांना पराभूत करण्याची क्षमता आहे. संपूर्ण जगाला याबाबत माहीत आहे आणि तेही पीडित आहेत. पण केवळ भारताकडेच अशा शक्तींना पराभूत करण्याची क्षमता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2019 7:32 pm

Web Title: rss chief mohan bhagwat republic day kanpur india peace anti national forces
Next Stories
1 अयोध्या प्रकरण: २९ जानेवारीस न्यायाधीश उपलब्ध नसल्याने सुनावणी पुढे ढकलली
2 तामिळनाडूत मोदींना विरोध, #GoBackModi ट्विटरवर ट्रेंड
3 अभिनेत्री ईशा कोप्पीकरचा भाजपामध्ये प्रवेश
Just Now!
X