News Flash

‘भारतात राहणाऱ्या प्रत्येकाचा डीएनए एकच’

भारताची संस्कृती सगळ्यांना जोडणारी

मोहन भागवत (संग्रहित छायाचित्र)

भारतात राहणाऱ्या प्रत्येकाचा डीएनए एकच आहे. एवढेच काय म्यानमार ते अफगाणिस्तान पर्यंत जे विविध समूह राहतात त्या सगळ्यांचे पूर्वज एकच होते असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. रायपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. अफगाणिस्तान, श्रीलंका, तिबेट, म्यानमार येथील नागरिकांचे भारताशी सहज नाते जुळते कारण सगळ्यांचे पूर्वज एकच आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.

सध्या परिस्थिती अशी आहे की आपण नाती विसरत चाललो आहोत. एकमेकांचे गळे धरून एकमेकांशी भांडत आहोत. आपल्या सगळ्यांचे घर एकच आहे हे सोयीस्करपणे विसरतो आहोत. आपल्या सगळ्यांचे पूर्वज एकच होते. गो रक्षा कशासाठी? सेंद्रीय शेती कशासाठी? ग्राम विकास का? असे प्रश्न सगळ्यांना पडतात.. मात्र त्याचे उत्तर हेच आहे की जे देशाच्या संस्कृतीपासून लांब गेले आहेत त्यांना जवळ आणले पाहिजे. भारत हा महान संस्कृती असलेला देश आहे. या देशात सामाजिक विषमता मिटली पाहिजे. जातीभेदाच्या भिंती पाडून टाकल्या पाहिजेत असेही मत भागवत यांनी व्यक्त केले.

भारत हा स्त्री शक्तीचे महत्त्व सांगणारा देश आहे. आदिवासी बांधवांसाठी राणी दुर्गावतीने बलिदान दिले होते. मात्र आज त्यांची अवस्था बिकट आहे. आदिवासी समाज शोषित आहे. निष्पाप आदिवासी समाजाला काही राष्ट्रविरोधी शक्ती त्यांच्याकडे आकर्षून घेत आहेत असेही मत भागवत यांनी मांडले. भारतात राहणारे सगळेच लोक हिंदू आहेत, असे वक्तव्य भागवत यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. या वक्तव्याचा पुनरूच्चार त्यांनी रायपूरच्या कार्यक्रमातही केला. तसेच जगाला सन्मार्गावर घेऊन जाण्यासाठीच भारताची निर्मिती झाली आहे असेही मत मोहन भागवत यांनी मांडले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 10:52 am

Web Title: rss chief says from afghanistan to myanmar we have same dna
टॅग : Mohan Bhagwat
Next Stories
1 मोदींनी नोकरीचे आश्वासन दिलेच नव्हते: केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला
2 वडिलांनी दुसरे लग्न करु नये म्हणून शिक्षिकेने बाळ चोरले
3 माझ्या आंदोलनातून यापुढे नेते निर्माण होणार नाहीत-अण्णा हजारे
Just Now!
X