दिल्लीच्या तख्तावरील शेवटचा सम्राट असलेल्या हेमू विक्रमादित्याच्या  (महाराजा हेमचंद्र विक्रमादित्य) स्वरूपात रा. स्व. संघ परिवाराला हिंदुत्वाचा नवा चेहरा सापडला असून येथील राष्ट्रीय संग्रहालयात हेमू विक्रमादित्य यांच्यावर परिसंवाद होणार आहे. महाराणा प्रताप, शिवाजी महाराज यांच्यानंतर आता संघाला हेमू विक्रमादित्य यांच्या रूपाने मध्ययुगीन भारतातील एक नवा चेहरा मिळाला आहे. हेमू यांचा पानिपतच्या दुसऱ्या युद्धात पराभव झाल्यानंतर दिल्लीची सत्ता मुघलांच्या ताब्यात गेली होती.
रा.स्व. संघाच्या अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेने पुढच्या महिन्यात ‘हेमू विक्रमादित्य – भारताचे महान योद्धे व दिल्लीचे शेवटचे हिंदू सम्राट’ या नावाने परिसंवाद व आदरांजलीचा कार्यक्रम होईल. ५ ऑक्टोबरला दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात हा कार्यक्रम होत असून केंद्रीय सांस्कृतिकमंत्री श्रीपाद येसू नाईक या वेळी उपस्थित राहणार आहेत. विश्व हिंदू परिषदेचे सह महासचिव विनायक देशपांडे प्रमुख पाहुणे असतील. १३व्या शतकाच्या सुरुवातीला मुघल सलतनतीची वाढ होत असताना ऑक्टोबर १५५६ मध्ये हेमू यांनी स्वत:ला हिंदू सम्राट घोषित करून दिल्लीची सत्ता हाती घेतली होती. पानिपतच्या दुसऱ्या लढाईत, ५ नोव्हेंबर १५५६ च्या सुमारास हेमूची गाठ १४ वर्षांचा अकबर याच्याशी पडली. हेमूने पुढे होऊन लढाई लढली. तो जिंकण्याच्या बेतात होता पण तेवढय़ात त्याच्या डोळ्याला बाण लागला व हत्तीवरून खाली पडला. त्यामुळे त्याच्या सैन्यात घबराट पसरली. अकबराचा रक्षक बैराम खान याने हेमूचे शिर उडवले व त्याच्या सैन्याची कत्तल केली. त्यामुळे दिल्लीत मुघलांची सत्ता आली.

Statue, Shivaji Maharaj, Assam,
आसाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, चीनच्या सीमेवर २१ पॅरा स्पेशल फोर्समध्ये अनावरण, साताऱ्यातील सुपुत्राचा पुढाकार
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
Rohit Sharma 17 times Golden Duck
MI vs RR : रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, दिनेश कार्तिकसह ‘या’ यादीत पोहोचला पहिल्या स्थानावर