18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

तुमचं ऐकणारं कोणी नाही, जिथं सुरक्षित वाटतं त्या देशात जा; हामिद अन्सारींना ‘संघा’चा सल्ला

अन्सारी हे पूर्वी भारतीय होते. आता ते जातीयवादी झाले आहेत अशी टीका केली.

नवी दिल्ली | Updated: August 13, 2017 9:15 AM

अन्सारींनी त्यांना जिथं सुरक्षित वाटतं, अशा एखाद्या देशात गेले पाहिजे. अन्सारी हे पूर्वी भारतीय होते. आता ते जातीयवादी झाले आहेत, असं इंद्रेश कुमार म्हणाले.

माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी नुकतेच पदावरून पायउतार होताना देशातील मुसलमान सुरक्षित नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने (आरएसएस) समाचार घेतला आहे. संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी शनिवारी अन्सारी यांच्यावर टीका केली आहे. अन्सारींनी केलेले वक्तव्य मुसलमान समाजातही ऐकणारे कोणी नाहीत. माजी उपराष्ट्रपतींचे वक्तव्य दुर्दैवी आहे. त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करणारेही कोणी पुढे आले नाही. मुसलमानांनीही त्यांच्या याला विरोध केल्याचे इंद्रेश कुमार यांनी म्हटले.

राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या वतीने आयोजित राखी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात इंद्रेश कुमार बोल होते. अन्सारींनी त्यांना जिथं सुरक्षित वाटतं, अशा एखाद्या देशात गेले पाहिजे. अन्सारी हे पूर्वी भारतीय होते. आता ते जातीयवादी झाले आहेत. ते पूर्वी सर्वपक्षीय नेते होते. पण ते आता काँग्रेसवादी झाले आहेत. गेल्या १० वर्षांत ते असुरक्षित नव्हते. पण आता त्यांना असुरक्षित वाटत आहे. त्यांनी अशा एका देशाचे नाव सांगावे जिथं मुसलमानांमध्ये असुरक्षततेची भावना आहे. मला वाटत नाही की, अन्सारींनी चिंता करण्याची गरज नाही. त्यांना कुठं सुरक्षित वाटतं तिथं त्यांनी जावं, असा सल्ला त्यांनी दिला.

त्यांनी काश्मीरप्रश्नीही भाष्य केले. ते म्हणाले, राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या वतीने दि.९ ते १४ ऑगस्टपासून पाकव्याप्त काश्मीर (पीओके) छोडो नावाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. पीओकेत राहणारे सर्व लोक अजूनही भारतावर प्रेम करतात. यापूर्वी शिवसेनेनेही हामिद अन्सारींवर टीका केली होती.

First Published on August 13, 2017 9:03 am

Web Title: rss indresh kumar criticize to former vice president hamid ansari on his statement on muslim community