राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तसेच या व्हिडीओमध्ये काही जण हाणामारी करताना दिसत आहे. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहेत.

बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील शाखेत ही घटना घडली. दरम्यान, याचे पडसाद गुरूवारी विधानसभेतही पहायला मिळाले होते. भाजपाचे आमदार मदन दिलावर यांनी विधानसभेत हा मुद्दा उचलून धरला. तसेच हे केरळ किंवा बंगाल नसून राजस्थान असल्याचे म्हटले. तसेच असे हल्ले आम्ही सहन करणार नाही. सरकारवर दबाव असल्यामुळेच कोणतीही कारवाई होत नसल्याचे ते म्हणाले होते.