News Flash

संघाचा शबरीमला मंदिराला युद्ध क्षेत्र बनवण्याचा प्रयत्न; केरळच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप

महिलांच्या मंदिर प्रवेशावरुन गेल्या काही दिवसांपासून शबरीमला मंदिर परिसरात तणावाचे वातावरण आहे.

संग्रहित छायाचित्र

केरळमधील शबरीमला मंदिर परिसराला युद्ध क्षेत्र बनवण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न असल्याचा घाणाघाती आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी केला आहे. महिलांच्या मंदिर प्रवेशावरुन गेल्या काही दिवसांपासून शबरीमला मंदिर परिसरात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले.

पिनरायी म्हणाले, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचे केरळ सरकार पालन करीत आहे. महिलांना प्रवेशासाठी सरकारने संरक्षणासह सर्वप्रकारच्या सुविधा पुरवल्या आहेत. त्यामुळे सरकार किंवा पोलीस प्रशासन भाविकांना अडवण्याचे प्रयत्न करीत नाही. त्यामुळे इथं कायदा सुव्यवस्था अपयशी ठरल्याचे म्हणता येणार नाही. उलट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शबरीमला मंदिर परिसराला युद्ध क्षेत्र बनवलं आहे.

दरम्यान, आंदोलक येथे येणाऱ्या लोकांची वाहने तपासत आहेत. महिला भाविकांवर तसेच माध्यम प्रतिनिधींवर हल्ले करीत आहेत. केरळच्या इतिहासात पहिल्यांदाच या गोष्टी घडत आहेत. माध्यमांप्रती अशा स्वरुपाचा आक्रमक पवित्रा पहिल्यांदाच राज्यात पहायला मिळत आहे, असेही मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 12:33 pm

Web Title: rss tried to make sabarimala temple a war zone says kerala cm pinarayi vijayan
Next Stories
1 2019 मध्ये पंतप्रधान मोदींची खुर्ची जाणार – शरद पवार
2 इलेक्शन ड्युटीसाठी जाणाऱ्या जवानांच्या बसला अपघात, 29 जखमी
3 सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात माझी महत्त्वाची भूमिका असेल – शरद पवार
Just Now!
X