09 March 2021

News Flash

सीएएविरोधातील बहिष्काराला उत्तर देण्यासाठी आरएसएसची नवी ‘सुपरमार्केट’ नीती

मुस्लिमबहुल भागांमध्ये वाढवणारं आपल्या सुपरमार्केटचं जाळं

संग्रहित छायाचित्र

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात या वर्षी जानेवारी महिन्यांत देशातील विविध राज्यांमध्ये बरीच निषेध आंदोलनं आणि बहिष्कारांची प्रकरणं झाली. यामध्ये केरळमध्ये सर्वाधिक आणि विशेषतः मुस्लिमबहुल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाली. त्यामुळे इथल्या व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली होती. या नव्या कायद्याबाबत जनजागृतीसाठी भाजपाने चौकाचौकांमध्ये चर्चांची योजना आखली मात्र त्याचा फायदा झाला नाही.

त्यामुळे आता केरळमध्ये मुस्लिमबहुल भागांतून होत असलेल्या सीसीएविरोधी बहिष्काराला उत्तर देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) अक्षयश्री मिशनअंतर्गत सुपरमार्केट उघडण्याची योजना आखली आहे. संघ परिवारातील सहकार भारती या संघटनेकडून चालवल्या जाणाऱ्या स्वयंसहाय्यता गटांचं हे जाळं आहे. सहा वर्षांपूर्वी सुरु झालेल्या अक्षयश्री मिशनची सुरुवातीला केवळ २४ सुपरमार्केट्स होती. तर गेल्या दहा महिन्यांत १० आणखीन सुपरमार्केट्स सुरु करण्यात आले आहेत. इतर ४० सुपरमार्केट्ससाठीची नोंदणी प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. इंडियन एक्प्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे.

केरळमधील हिंदू ऐक्यवादी संघटनेचे सरचिटणीस आरवी बाबू यांनी सांगितले की, ‘जानेवारी महिन्यांत सीएएवरील बहिष्काराला उत्तर देण्यासाठी अधिकाधिक सुपरमार्केट लॉन्च करण्यात येत आहेत. अक्षयश्री मिशन नावाने आधिच काही दुकानं सुरु करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर सुरु करण्यात आलेली सुपरमार्केट्स ही सीएएच्या बहिष्काराविरोधात सुरु करण्यात आली आहेत.”

या कथित बहिष्कारावर बोलताना संघाच्या सुत्रांनी सांगितलं की, “हिंदु दुकानदारांच्या दुकानातून वस्तू खरेदी न करण्याबाबत हे बहिष्काराचं अभियान सुरु होतं. या आंदोलनांमुळे आम्हाला काही शहरांमध्ये एका दिवसापेक्षा अधिक बैठका घ्याव्या लागल्या. ज्या लोकांना दुकानं बंद करण्यास जबरदस्ती केली, त्यांना भाजपाचं म्हणणं ऐकून घ्यायचं नाहीए. मात्र, आता आम्ही या बहिष्काराला उत्तर देण्यासाठी नवी सुपरमार्केट्स सुरु केली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 9:36 am

Web Title: rsss new supermarket policy to respond to boycott against caa at kerala aau 85
टॅग : CAA
Next Stories
1 मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्यापाठोपाठ त्यांच्या मुलीलाही करोनाची लागण
2 दिल्ली हिंसाचार प्रकरण : “हिंदूंना धडा शिकवण्यासाठी…”; आपच्या निलंबित नगरसेवकाची धक्कादायक कबुली
3 अमित शहा यांना करोना
Just Now!
X