25 March 2019

News Flash

गुजरात विधानसभेत राडा, काँग्रेस आमदाराची भाजपा आमदाराला पट्ट्याने मारहाण

गुजरात विधानसभेत बुधवारी खडाजंगी पहायला मिळाली

Gujrat Assembly Election 2017: प्रचाराचा विचार केल्यास भाजपने आतातरी आघाडी घेतल्याचं दिसतंय. एक बूथ दहा युथ, शक्तिकेंद्र, पेजप्रमुख या माध्यमातून शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याची रणनीती पक्षानं आखलीये.

विधानसभा म्हणजे राज्याच्या आणि सर्वसामामन्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याचं ठिकाण. चर्चा करताना अनेकदा आमदारांमध्ये शाब्दिक चकमकी होत असतात. मात्र गुजरात विधानसभेत बुधवारी वेगळंच चित्र पहायला मिळालं. बोलायला दिलं जात नसल्याचा आरोप करत काँग्रेस आमदारांनी विधानसभेत तुफान राडा घातला. काँग्रेस आमदारांनी यावेळी सभापतींच्या माईकची तोडफोड केली. इतकंच नाही तर काँग्रेस आमदाराने भाजपा आमदाराला पट्ट्याने मारहाणही केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सभापती नेहमी भाजपा आमदारांनाच बोलण्याची संधी देत असतात असा आक्षेप काँग्रेस आमदारांनी घेतला होता. यामुळे जेव्हा भाजपा आमदार बोलायला उभे राहिले तेव्हा काँग्रेस आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या भाजपा आमदार जगदीश पांचाळ यांना तर चक्क कमरेच्या पट्ट्याने मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर माईकची तोडफोडही करण्यात आली. मारहाण करणा-या काँग्रेस आमदाराचं नाव प्रताप दुधात असल्याचं कळत आहे. प्रताप दुधात हे काँग्रेसचे निकोल मतदारसंघाचे आमदार आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे आमदार विक्रम माडम यांनी माईक तोडला, तर राजुलाचे आमदार अंबरीश डेर यांनीही भाजपा आमदाराला मारहाण केली.

First Published on March 14, 2018 1:24 pm

Web Title: ruckus in gujarat assembly