18 September 2020

News Flash

सामान्यांच्या खिशाला झळ ! टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीनच्या किंमती वाढणार?

सणासुदीच्या काळात जर तुम्ही टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन यांसारखी उत्पादनं खरेदी केली नसतील तर आता ही उत्पादनं खरेदी करणं तुम्हाला महागात पडू शकतं

सणासुदीच्या काळात जर तुम्ही टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन यांसारखी उत्पादनं खरेदी केली नसतील तर आता ही उत्पादनं खरेदी करणं तुम्हाला महागात पडू शकतं. कारण अनेक कंपन्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण आणि परदेशी वस्तूंवर वाढलेल्या कस्टम डय़ुटीचा फटका घरगुती वापराच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना बसणार आहे. 3 ते 10 टक्क्यांनी या किंमती वाढू शकतात. गेल्या महिन्यातच ही दरवाढ होणार होती. मात्र, सणासुदीचा काळ असल्याने ही वाढ पुढे ढकलण्यात आली होती. अनेक कंपन्यांनी रिटेलर्सना दिली जाणारी 10 टक्के सूट देखील रद्द केल्याची माहिती आहे. एलजी, सॅमसंग आणि सोनीने आपल्या वस्तूंवरील सामान्य विक्री किमतीवरील 10 टक्केपर्यंतच्या डिस्काऊंटसाठी दिली जाणारी सबसिडी मागे घेतली आहे. हायर इंडियाने त्यांच्याकडील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमतीत 5 ते 8 टक्क्यांनी वाढ केली आहे. बॉश, सीमेन्स, शाओमी आणि बीपीएल यांसारख्या कंपन्याही लवकरच किमतींमध्ये वाढ करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 9:24 am

Web Title: rupee depreciation and increase in customs levies tv sets appliances may cost 3 10
Next Stories
1 जम्मू-काश्मीर : शोपियांमध्ये चमकतीत ४ दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद
2 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
3 छत्तीसगढमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; ९ मंत्र्यांसह १०७९ उमेदवार रिंगणात
Just Now!
X