News Flash

PAYTM मध्ये कॅशबॅकच्या नावाखाली १० कोटींचा घोटाळा

पेटीएममध्ये हा फसवणुकीचा प्रकार उघड झाल्यानंतर या फसवणुकीशी संबंधित असलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

नोटाबंदीनंतर पेटीएम ही कंपनी चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पेटीएम ही कंपनी चर्चेत आली आहे. कॅशबॅकच्या माध्यमातून पेटीएमममध्ये १० कोटी रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. खुद्द कंपनीचे प्रमुख विजय शेखर शर्मा यांनी याबाबत माहिती दिली.

पेटीएममध्ये हा फसवणुकीचा प्रकार उघड झाल्यानंतर या फसवणुकीशी संबंधित असलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त या फसवणुकीमध्ये सहभागी असलेल्या विक्रेत्यांनाही कंपनीच्या यादीतून काढण्याची कारवाई करण्यात आली आहे. कॅशबॅकच्या नावावर कंपनीमध्ये १० कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक करण्यात आली. दिवाळीनंतर कॅशबॅकच्या नावाखाली मोठी रक्कम वळती होत असल्याची माहिती मिळाल्याचे शर्मा यांनी सांगितले. यावरून कंपनीला संशय आल्यानंतर कंपनीने लेखापरिक्षण सुरू केल्याचे ते म्हणाले. लेखापरीक्षणात कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी कॅशबॅकच्या नावावर ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम दिल्याचे समोर आले. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार हा सुरू निदर्शनास आल्याचेही त्यांनी सांगितले.

कंपनीने या प्रकारानंतर या फसवणुकीत सहभागी असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. तसेच यातील विक्रेत्यांवरही कारवाई सुरू केली असल्याचे शर्मा म्हणाले. नव्या विक्रेत्यांना कंपनीशी जोडण्याचे काम सुरूअसून यापुढे ब्रॅन्डेड विक्रेत्यांनाच सोबत घेण्याचे प्रयत्न केले जातील असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, पेटीएमसारखे प्लॅटफॉर्म प्रोसेसिंग ट्रान्झॅक्शनसाठी देण्यात आलेल्या मर्चंट डिस्काऊंड रेटच्या माध्यमातून नफा मिळवत असतो. तसेच चित्रपटांच्या तिकीटांची विक्री केल्यानंतर त्यातून १५ टक्के रक्कम मिळते. त्यातूनच कशबॅकसारख्या सुविधा देण्यास मदत मिळत असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पेटीएमने मंगळवारीच नवे क्रेडिट कार्ड लॉन्च केले. यासाठी कंपनीने सिटी बँकेसोबत हातमिळवणी केली असून या क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्या ग्राहकांना एक टक्का युनिव्हर्सल अनलिमिटेड कॅशबॅक देण्यात येणार आहे. तसेच या कार्डवरून करण्यात आलेल्या ट्रान्झॅक्शननंतर मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉईंटना कोणत्याही अटी लागू नसतील, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. या क्रेडिट कार्डला पेटीएम फर्स्ट कार्ड असे नाव देण्यात आले आहे. यासाठी कंपनी वार्षिक ५०० रूपये शुल्क आकारणार आहे. जर वर्षाला एखाद्या ग्राहकांने या कार्डच्या माध्यमातून ५० हजार रूपयांची खरेदी केल्यास त्याला हे शुल्क भरावे लागणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 1:40 pm

Web Title: rupees 10 crore fraud in paytm under cashback scheme vijay shekhar sharma
Next Stories
1 दस का दम! जगातील तिसऱ्या उंच शिखरावर पुण्यातील १० जणांनी फडकावला तिरंगा
2 प. बंगालमध्ये निवडणूक आयोगाची दुटप्पी भुमिका; अमित शाहांचा आरोप
3 एअर इंडियाच्या वैमानिकावर लैंगिक शोषणाचे आरोप, चौकशीचे आदेश
Just Now!
X