करोनाशी मुकाबला करण्यासाठी आम्हाला भारताने जी मदत केली त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे असं म्हणत रशियाने भारताचे आभार मानले आहेत. करोनासोबत लढा देण्यासाठी भारताने जी औषधं पाठवण्याचा निर्णय घेतला आहे तो महत्त्वाचा आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे प्रवक्ते यांनी भारताच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.

रशियात करोनाचे ३२ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर २७० पेक्षा जास्त रुग्णांचा करोनाची लागण झाल्याने बळी गेला आहे. अशा सगळ्या परिस्थितीत भारताने केलेली मदत महत्त्वाची आहे. त्यामुळेच रशियाने भारताचे आभार मानले आहे. सध्या सगळं जग करोनाशी लढा देतं आहे. अशात परिस्थितीही भारताने आम्हाला मदत केली हे महत्त्वाचे आहे असंही रशियाने म्हटलं आहे.