News Flash

रशियाची बहुचर्चित लस बाजारात कधी येणार?; उत्तर मिळालं

जगातील पहिली लस विकसित केल्याचा रशियानं केला होता दावा.

रशियातील एका विद्यापीठानं करोनावरील पहिली लस यशस्वीरित्या विकसित केल्याचा दावा केला होता. दरम्यान, ही लस छोट्या प्रमाणात करण्यात आलेल्या मानवी चाचणीदरम्यान यशस्वी ठरली असून ती माणसांसाठी सुरक्षित असल्याचंदेखील विद्यापीठानं म्हटलं होतं. मॉस्कोच्या सेचेनोव्ह विद्यापीठानं ३८ स्वयंसेवकांवर यशस्वीरित्या ही चाचणी केली. त्याचबरोबर, रशियन सैन्यानेदेखील सरकारी गेमलेई राष्ट्रीय संशोधन केंद्रात दोन महिन्यांत समांतर चाचण्या पूर्ण केल्या. ही लस सर्वांसाठी ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

१२ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान ही लस ‘सिव्हिल सर्कुलेशन’मध्ये असेल अशी अपेक्षा असल्याचं मत गॅमलेई सेंटरचे प्रमुख अलेक्झांडर गिंटझबर्ग यांनी सरकारी वृत्तसंस्था ‘टास’शी बोलतानं सांगितलं. अलेक्झांडर यांच्या म्हणण्यानुसार सप्टेंबरपासून खासगी कंपन्या या लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करणार आहेत.

गेमलई संशोधन केंद्राच्या प्रमुखांच्या मते ही लस मानवी चाचणीत पूर्णपणे सुरक्षित ठरली आहे. ऑगस्टमध्ये जेव्हा ही लस उपलब्ध केली जाणार आहे तेव्हा ती तिसऱ्या टप्प्यातील चाचणीप्रमाणे असेल. कारण ज्यांना ही लस दिली जाईल त्यांच्यावर देखरेख ठेवली जाणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात लस किंवा औषधाची चाचणी केली जाते आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात त्यांची चाचणी होते. या लसीची १८ जून रोजी चाचणी सुरू करण्यात आली होती. सुरूवातील ९ स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली. त्यानंतर आणखी ९ जणांना ही लस देण्यात आली. कोणत्याही स्वयंसेवकावर याचे दुष्परिणाम दिसले नाहीत. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

सेचेनोव्ह विद्यापीठातील स्वयंसेवकांच्या दोन ग्रुपना पुढील बुधवारी सुट्टी देण्यात येणार आहे. त्यांना २३ जून रोजी लस देण्यात आली होती. सध्या त्यांना २८ दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. १८ ते ६५ वर्षांदरम्यान वय असलेल्या या स्वयंसेवकांना पुढील सहा महिन्यांसाठी देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रोटोकॉलनुसार कोणत्याही लसीची अथवा औषधाची मोठ्य़ा प्रमाणात उत्पादन होण्यापूर्वी तीन टप्प्यांत चाचणी होणं आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 11:48 am

Web Title: russia says it plans to launch worlds first covid 19 vaccine in mid august chief says news agency jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 काय म्हणावं चीनला, गलवान संघर्षात ठार झालेल्या आपल्याच सैनिकांचा केला अपमान
2 चीनसोबत मेगा डीलनंतर इराणचा भारताला झटका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
3 नवजात मुलीचा जीव वाचवण्यासाठी ब्लड प्लाझ्मा घेऊन चालले होते, पण रस्त्यात कारने धडक दिली आणि….
Just Now!
X