07 July 2020

News Flash

Good News: रशियाने बनवलं नवीन औषध, चार दिवसात रुग्ण करोनामुक्त झाल्याचा निष्कर्ष

रशियन शास्त्रज्ञांनी मूळ जपानी औषधात केले बदल

रशियाने करोना व्हायरसवर प्रभावी ठरणारे एक औषध विकसित केले आहे. पुढच्या आठवडयापासून रशियामध्ये करोनाची लागण झालेल्या रुग्णांवर या औषधाचा वापर सुरु होणार आहे. रशियाच्या आरोग्य यंत्रणेने हे औषध वापरण्यास मंजुरी दिली आहे. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे. या नव्या औषधामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल तसेच विस्कटलेली आर्थिक घ़डी रुळावर येऊन सर्वसामान्य जीवन हळूहळू पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे.

एविफेविर या नावाने औषधाची नोंदणी झाली आहे. पुढच्या आठवडयापासून म्हणजे ११ जूनपासून रशियन रुग्णालयांमध्ये करोना रुग्णांवर या अँटीव्हायरल औषधाने उपचार सुरु होणार आहेत. रशियाच्या आरडीआयएफ प्रमुखाने रॉयटर्सला ही माहिती दिली. एविफेविर औषध बनवणारी कंपनी महिन्याला ६० हजार रुग्णांवर उपचार करता येतील, इतक्या प्रमाणात औषध बनवणार आहे.

करोना व्हायरसचा फैलाव रोखणारी सध्या कुठलीही लस उपलब्ध नाहीय. आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या काही औषधांच्या चाचण्या सुरु असून काही औषध प्रभावी सुद्धा ठरत आहेत. अमेरिकेतील गिलीयड सायन्सेस या कंपनीने बनवलेले रेमडेसिविर हे अँटीव्हायरल औषधही करोनावरील उपचारांमध्ये प्रभावी ठरत आहे.

एविफेविर हे औषध फॅव्हीपीरावीर म्हणून ओळखले जाते. १९९० साली जपानी कंपनीने या औषधाची निर्मिती केली होती. जपानमधील फुजीफिल्म होल्डींग कॉर्पोरेशन एविगन या ब्रॅण्डनेमखाली फॅव्हीपीरावीर या औषधाची निर्मिती करते. जपानमध्ये ताप, सर्दीवर असलेल्या फॅव्हीपीरावीर या औषधाचा वापर केला जातो.

फॅव्हीपीरावीर हे मूळचे जपानी औषध आहे. त्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी रशियन शास्त्रज्ञांनी त्यामध्ये काही बदल केले आहेत. पुढच्या दोन आठवडयात रशियाकडून बदल करुन बनवण्यात आलेल्या या औषधाबद्दल जगाला माहिती दिली जाईल असे आरडीआयएफच्या प्रमुखांनी सांगितले. “रशियात करोनाची लागण झालेल्या ३३० रुग्णांवर या औषधाच्या चाचण्या घेण्यात आल्या. बुहतांश केसेसमध्ये रुग्ण हे चार दिवस पूर्णपणे बरे झाल्याचे दिसून आले” असे आरडीआयएफच्या प्रमुखांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 9:16 am

Web Title: russia to roll out its first approved avifavir drug to treat covid 19 dmp 82
टॅग Coronavirus
Next Stories
1 जम्मू-काश्मीर : एका दहशतवाद्याचा खात्मा, अवंतीपोरा भागात चकमक सुरू
2 करोनापाठोपाठ इबोलाचा नव्याने उद्रेक; काँगोमध्ये चार जणांचा मृत्यू
3 रेल्वेत एकाही प्रवाशाचा अन्न-पाण्यावाचून मृत्यू झालेला नाही; रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचा दावा
Just Now!
X