05 August 2020

News Flash

पक्ष्यांच्या थव्याला विमानाची धडक, मक्याच्या शेतात इमर्जन्सी लँडिंग; २३३ प्रवासी थोडक्यात बचावले

वैमानिकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली

(Photo: Reuters)

पक्षी इंजिनमध्ये घुसल्याने मक्याच्या शेतात विमानचं इमर्जन्सी लॅण्डिंग करावं लागल्याची घटना रशियामध्ये घडली आहे. वैमानिकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या दुर्घटनेतून २३३ प्रवासी थोडक्यात बचावले. दरम्यान २३ प्रवासी जखमी झाले आहेत. राजधानी मॉस्कोजवळ विमानाने टेक-ऑफ केल्यानंतर काही वेळातच विमानाचं एका शेतात इमर्जन्सी लँण्डिँग करावं लागलं अशी माहिती एअरलाइन आणि हवाई वाहतूक एनज्सीने दिली आहे. पक्ष्यांच्या थव्याला धडक दिल्याने हे लँण्डिंग करावं लागलं.

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान युराल एअरलाइन्सचं होतं. विमानात एकूण २३३ प्रवासी प्रवास करत होते. विमानाने टेक-ऑफ करताच पक्ष्यांचा एक मोठा थवा विमानाला धडकला. काही पक्षी इंजिनमध्ये अडकल्याने विमानात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे वैमानिकाला एका मक्याच्या शेतात विमानाचं इमर्जन्सी लँण्डिंग करावं लागलं अशी माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

विमानांचं खूप नुकसान झालं असून २३ प्रवासी जखमी झाले आहेत. याआधी काही प्रसारमाध्यमांनी विमानात २३४ प्रवासी असल्याचं वृत्त दिलं होतं. “दोन्ही इंजिनमध्ये पक्षी अडकले होते. यामुळे इंजिन बंद पडलं. अशा परिस्थिती इमर्जन्सी लँण्डिंग करावंच लागणार होतं”, अशी माहिती विमान कंपनीने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2019 4:50 pm

Web Title: russian plane ural airlines emergency landing flock of birds sgy 87
Next Stories
1 वॉर रुममधून अभिनंदन यांना मार्गदर्शन करणाऱ्या IAFच्या महिला अधिकाऱ्याला ‘युद्ध सेवा मेडल’
2 पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्यासाठी मदत करा; बलुचिस्तानातील कार्यकर्त्यांची भारताला हाक
3 Independence day: पाकिस्तानी नेटकऱ्यांना अदनान सामीने दिली सडेतोड उत्तरं, म्हणाला…
Just Now!
X