रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते डिमिट्री पेस्कोव्ह यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. असोसिएटेड प्रेसने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

‘मी आजारी आहे आणि माझ्यावर उपचार सुरु आहेत’ असं पेस्कोव्ह यांनी रशियातील प्रसारमाध्यमांना सांगितलं. पेस्कोव्हे हे रशियातले चौथे वरिष्ठ सरकारी अधिकारी आहेत ज्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्याआधी रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिसह्युस्टिन, सांस्कृतिक मंत्री ओल्गा ल्युबिमोव्हा आणि बांधकाम मंत्री व्लादिमिर याकुशेव यांना करोनाची लागण झाली आहे. दरम्यान तिघांपैकी एकाचीही प्रकृती गंभीर नाही. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

पेस्कोव्ह हे २००० पासून व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते आहेत. ते त्यांचे अत्यंत जवळचे आणि खास मानले जातात. दरम्यान रशियात आत्तापर्यंत २ लाख ३२ हजार २४३ जणांना करोनाची लागण झाली आहे. एएफपीने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.