रशियातील एका दुर्दैवी घटनेत सतत बावीस दिवस ऑनलाइन गेम खेळणाऱ्या किशोरवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. रुस्तम असे त्याचे नाव असून तो १७ वर्षांचा होता. त्याच्या पायास दुखापत झालेली होती व कंटाळलेला होता, त्याने त्याचे आवडते पात्र पडद्यावर मरताना पाहिले होते त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. दक्षिण रशियातील बशकोरतोस्ताना प्रजासत्ताकात उचाली येथे ही घटना घडली.
८ ऑगस्टला पायास दुखापत झाल्याने तो घरात बसून होता. त्याच्यावर कुणाचेही लक्ष नव्हते. ‘डिफेन्स ऑफ द एन्शंट्स’ हा गेम तो सतत खेळत होता व केवळ झोपणे, खाण्यासाठी थांबत होता. चौकशीकर्त्यांनी सांगितले, की त्याने दीड वर्षांत दोन हजार तास गेम खेळण्यात घालवले होते. रोज साडेसहा तास तो खेळत असे. त्यानंतर बावीस दिवस तो अखंड गेम खेळला. केवळ झोप व खाण्यापुरते थांबत होता असे पोलिस प्रवक्तया स्वेतलाना अब्रामोवा यांनी सांगितले. न्यायालयाने त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी वैद्यकीय पथक नेमले होते.
मुलाच्या आईवडिलांनी सांगितल्यानुसार तो सतत त्याच्या खोलीत गेम खेळत होता. शुद्ध हरपल्याने त्याला रुग्णालयात नेले असता तो आधीच मरण पावलेला होता.