28 September 2020

News Flash

रशियात रहस्यमयी स्फोटानंतर किरणोत्सर्ग वाढला, नागरिकांकडून आयोडिनचा साठा

रशियात लष्करी चाचणी तळाजवळ एक रहस्यमयी अपघात झाला

प्रतिनिधीक छायाचित्र

रशियात लष्करी चाचणी तळाजवळ एक रहस्यमयी अपघात झाला आहे. त्यानंतर उत्तर रशियाच्या दोन शहरातील नागरीकांनी घरात आयोडिनचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. किरणोत्सर्गाचा प्रभाव कमी करण्यासाठी आयोडिनचा वापर केला जातो. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या अपघातासंबंधी सविस्तर माहिती देण्याचे टाळले आहे. उत्तर रशियात चाचणी तळाजवळ एका रॉकेट इंजिनचा स्फोट झाला. त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाल्याची माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

स्फोटानंतर घातक रसायने वातावरणात मिसळलेली नसून किरणोत्सर्गाच्या पातळीमध्ये देखील बदल झालेला नाही असे मंत्रालयाने म्हटले आहे. चाचणी तळाजवळ असणाऱ्या सेवेरोड्विंन्स्क शहरातील अधिकाऱ्यांनी किरोणीत्सर्गाच्या पातळीमध्ये वाढ नोंदवली आहे. या अपघातामुळे किरोणीत्सर्ग का वाढला ? त्याविषयी कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. सेवेरोड्विंन्स्क आणि अर्खन्गेस्क शहरातील औषध दुकानातील आयोडिनचा स्टॉक संपला आहे.

सेवेरोड्विंन्स्कमध्ये अण्वस्त्र पाणबुडयांची निर्मिती केली जाते. आज मोठया प्रमाणावर लोक आयोडिन खरेदी करण्यासाठी आले. आमच्याकडे अजूनही आयोडिन शिल्लक आहे असे एका औषध विक्रेत्याने सांगितले. रशियन प्रशासनाने सफेद सागरातील अपघात स्थळाजवळच्या जागेवर सागरी वाहतूक महिन्याभरासाठी बंद केली आहे. त्यासाठी कोणतेही कारण दिलेले नाही. रशियात न्योनोक्सा येथे शस्त्रास्त्रांची चाचणी केली जाते. रशियन नौदलाकडून ज्या बॅलेस्टिक, क्रूझ मिसाइलचा वापर होतो त्याची चाचणी येथे केली जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2019 1:43 pm

Web Title: russians rush to buy iodine after blast causes radiation spike dmp 82
Next Stories
1 मुलाची सटकली; ‘जग्वॉर’साठी ‘बीएमडब्ल्यू’ कार नदीत बुडवली
2 पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्यावरणाची प्रचंड काळजी- बेअर ग्रिल्स
3 काश्मीरच्या मुद्द्यावर रशियाची भारताला साथ
Just Now!
X