सार्वजनिक आरोग्यात सुधारणा व्हावी आणि धूम्रपान करणाऱ्यांची संख्या किमान निम्म्यावर यावी या उद्देशाने रशियाने धूम्रपानावर बंदी घालण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली असून त्याची अंमलबजावणी शनिवारपासून करण्यात आली आहे. तथापि, उपाययोजनांची परिणामकारक अंमलबजावणी होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
पहिल्या टप्प्यात बसगाडय़ा, ट्राम आणि अन्य सार्वजनिक वाहतूक सेवा, रेल्वे स्थानके आणि विमानतळे, लिफ्ट आणि बस स्थानके, मेट्रो आणि रेल्वे स्थानके, प्रशासकीय इमारती,  शैक्षणिक संस्था आणि आरोग्य केंद्रे येथे धूम्रपान करणे बेकायदेशीर ठरविण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी १ जून २०१४ पासून करण्यात येणार असून सिगारेटची जाहिरात आणि विक्री यावरही बंदी घालण्यात येणार आहे.