21 January 2021

News Flash

रशियाच्या स्पेशल फोर्सेस उतरल्या पाकिस्तानात, मैत्रीचा नवा अध्याय

रशिया भारताचा विश्वासू मित्र समजला जातो....

रशिया भारताचा विश्वासू मित्र आहे. पण आता रशिया पाकिस्तानच्या जवळ जात आहे. दोघांमध्ये मैत्री संबंध विकसित होत आहेत. पाकिस्तानी सैन्यासोबत संयुक्त लष्करी कवायती करण्यासाठी रशियाच्या स्पशेल फोर्सेस गुरुवारी विशेष विमानाने पाकिस्तानात दाखल झाल्या. DRUZHBA असे या लष्करी कवायतीचे नाव असून दोन आठवडे हा युद्ध सराव चालणार आहे.

पाकिस्तानी लष्कराकडून ही माहिती देण्यात आली आहे. “दोन्ही सैन्य दलांमध्ये दहशतवाद विरोधी कारवाईचा अनुभव शेअर करणे, हा या संयुक्त कवायतीमागे उद्देश आहे. स्काय डायव्हींग आणि ओलीस ठेवलेल्यांची सुटका कशी करायची, याचा अभ्यास या कवायतींमध्ये करण्यात येईल” असे पाकिस्तानी लष्कराच्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.

पाकिस्तान आणि रशिया २०१६ पासून हा लष्करी अभ्यास करत आहे. यंदाचे पाचवे वर्ष आहे. पाकिस्तानचे अमेरिकेसोबत असलेले संबंध बिघडल्यापासून पाकिस्तान रशिया आणि चीनच्या जास्त जवळ गेला आहे. पाकिस्तान रशियासोबत संरक्षण संबंध विकसित करण्यासाठी जास्त उत्सुक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2020 5:41 pm

Web Title: russias forces arrive in pakistan for joint military drill dmp 82
Next Stories
1 जॉर्जियात बायडेन यांना आघाडी, डोनाल्ड ट्रम्प यांचा मार्ग बनला खडतर
2 ‘उच्च जातीमधील व्यक्तीला केवळ…’; SC/ST Act संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण
3 अर्णब गोस्वामी यांना अटकेपासून संरक्षण; ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयात झटका
Just Now!
X