News Flash

करोना लसी संदर्भातील ‘त्या’ महत्त्वाच्या बैठकीत रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन एकच गोष्ट म्हणाले…

'करोना व्हायरसवर आपण जी लस बनवू'...

अमेरिका, चीन, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांच्या आधी रशियाला करोना व्हायरसवरील लसीची निर्मिती करायची आहे. त्या दृष्टीने रशियाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. रशियामध्ये करोना व्हायरसविरोधात दोन लसींची निर्मिती झाली आहे. प्रारंभिक चाचण्यांमध्ये मिळालेल्या यशामुळे या लसींबद्दल खूपच अपेक्षा वाढल्या आहेत.

सप्टेंबर आणि ऑक्टोंबरपासून या लसीची निर्मिती करण्याचा रशियाचा मानस आहे. रशियात राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अध्यक्षतेखाली लस निर्मितीबद्दल एक बैठक पार पडली. रशियाचे उपपंतप्रधान तात्याना गोलीकोव्हा सुद्धा या बैठकीमध्ये होते. मॉस्कोच्या संशोधन संस्थेत आणि सायबेरियातील प्रयोगशाळेत लसीची निर्मिती सुरु आहे.

“आज दोन लसींकडून खूपच अपेक्षा आहेत. रशियन संरक्षण मंत्रालयासोबत मिळून गेमली इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने बनवलेली लस सप्टेंबरपर्यंत सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करण्याची योजना आहे” असे गोलीकोव्ह म्हणाले.

सायबेरीजवळ असलेल्या शहरात वेक्टर स्टेट प्रयोगशाळेकडून करोना व्हायरसविरोधात लसीची निर्मिती करण्यात आली आहे. ऑक्टोंबरमध्ये ही लस आणण्याची योजना आहे. करोना रुग्ण संख्येमध्ये रशिया सध्या जगात चौथ्या स्थानावर आहे. सर्वसामान्यांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करणारा पहिला देश बनण्याचे रशियाचे लक्ष्य आहे.

ही लस लवकरात लवकर आणण्यासाठी रशियाकडून जे प्रयत्न सुरु आहेत, त्यावरुन पाश्चिमात्य मीडियाने रशिया विज्ञान आणि नागरिकांच्या सुरक्षेऐवजी राष्ट्रीय प्रतिष्ठेला प्रथम प्राधान्य देतोय ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान रशियात लसी संदर्भात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले कि,  “करोना व्हायरसवर आपण जी लस बनवू, त्याबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असली पाहिजे तसेच काळजीपूर्वक, संतुलन ठेवून आपल्याला करोनावर लसीची निर्मिती करायची आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 2:46 pm

Web Title: russina president vladimir putin chaired high level meeting on corona vaccine dmp 82
Next Stories
1 “राम मंदिरासोबतच सरकारकडून ‘ज्ञान मंदिरा’च्या उभारणीची पायाभरणी”
2 “पोलिसांना त्यांचं काम करु द्या”, सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
3 भारतानंतर ‘या’ देशातही टिकटॉकसह चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याची तयारी
Just Now!
X