गेल्या पाच दशकांहून अधिक काळ गुन्हेगारी कथा लिहून ब्रिटनमध्ये लोकप्रिय ठरलेल्या ‘बेस्ट सेलर’ लेखिका रुथ रेंडेल (८५) यांचे शनिवारी निधन झाले.
अत्यंत आवडत्या अशा लेखकांपैकी एक लेखिका आम्ही गमावली असून आमची मोठी हानी झाली आहे, आम्हाला त्यांची उणीव प्रकर्षांने जाणवेल असे ‘पेंग्विन रॅण्डम हाऊस’ ने म्हटले आहे.
समाजातील घटनांचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यांनी लिहिलेल्या अनेक चित्तथरारक कथा पुरस्कारप्राप्त ठरल्या. गुन्हेगारी प्रवृत्तीचे मानसशास्त्रीय अंगाने विश्लेषण करून रेंडेल यांनी  अनेक कथा लिहिल्या. ‘द रुख रेंडेल मिस्टेरीज’ वर दूरचित्रवाणीवरून झालेला कार्यक्रम यशस्वी ठरला होता.