उत्तर प्रदेशच्या राज्यपालांनी सर्जेराव निमसे यांची लखनौ विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमणूक केली आहे. निमसे हे सध्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. निमसे यांनी १९८२ मध्ये गणितात पीएच.डी. मिळवली. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९५० रोजी झाला. त्यांनी पदवी व पदव्युत्तर वर्गाना गणित शिकवले असून गेली ३४ वर्षे ते अध्यापनाचे काम करीत आहेत. त्यांनी एकूण १२ पुस्तके लिहिली असून त्यांचे १२ शोधनिबंधही प्रकाशित झाले आहेत. सध्याचे कुलगुरू असलेले निवृत्त आयएएस अधिकारी जी.बी.पटनायक हे येत्या दोन मे रोजी निवृत्त होत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2013 1:30 am