News Flash

एस. व्ही. रंगनाथ यांची कॅफे कॉफी डेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड

संचालक मंडळाची पुढील बैठक ८ ऑगस्ट रोजी होणार

‘कॅफे कॉफी डे’ चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाल्यानंतर कॉफी डे एंटरप्रायजेसच्या संचालक मंडळाने एस. व्ही. रंगनाथ यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. संचालक मंडळाची पुढील बैठक ८ ऑगस्ट रोजी होणार आहे.

कॅफे कॉफी डेचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह नेत्रावती नदीमध्ये सापडला आहे. ते सोमवारपासून बेपत्ता होते. व्ही. जी. सिद्धार्थ हे कॅफे कॉफी डेचे संस्थापक, मालक आणि भाजपा नेते एस. एम. कृष्णा यांचे जावई होते.

मागील २४ तासांपासून कॅफे कॉफी डेचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ बेपत्ता होते. बंगळुरुहून साकलेशपूरला जात असताना ते नेत्रावती नदीच्या पुलावर उतरले. त्यानंतर त्यांनी कार घेऊन ड्रायव्हरला पुढे जाऊन थांब असे सांगितले. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. त्यांचं झालं काय हा प्रश्न कायम होता. अखेर त्यांचा मृतदेह हाती लागला आहे. सोमवार संध्याकाळपासून ते बेपत्ता झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 2:21 pm

Web Title: s v ranganath appointed as the interim chairman of the coffee day msr 87
Next Stories
1 आॅगस्टा वेस्टलँड प्रकरणातील साक्षीदाराची हत्या झाल्याची भीती; ईडीची धक्कादायक माहिती
2 फारूक अब्दुलांची ईडीकडून चौकशी
3 दुबई: पंतप्रधानांच्या सहाव्या पत्नीने लंडन कोर्टात मागितले संरक्षण
Just Now!
X