News Flash

सचिन पायलट मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या प्रचारात

कमलनाथ यांनी सचिन पायलट यांना पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार करण्याची विनंती केली होती.

संग्रहित छायाचित्र

भोपाळ: राजस्थानमध्ये बंडाचा झेंडा फडकावणारे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आता मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या २८ जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उतरणार आहेत, असे पक्षाच्या प्रवक्त्याने रविवारी सांगितले. या २८ जागांपैकी बहुसंख्य जागा ग्वाल्हेर-चंबळ क्षेत्रातील असून त्या पायलट यांचे माजी सहकारी ज्योतिरादित्य शिंदे यांचे बालेकिल्ले मानल्या जातात. निवडणूक आयोगाने या पोटनिवडणुकीचे वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही. काँग्रेसच्या २५ आमदारांनी दिलेले सदस्यत्वाचे राजीनामे आणि तीन विद्यमान सदस्यांचा झालेला मृत्यू यामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. मध्य प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी सचिन पायलट यांना पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार करण्याची विनंती केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 12:01 am

Web Title: sachin pilot in madhya pradesh for congress campaign zws 70
Next Stories
1 “मी देखील शेतकरी आहे….”; राजनाथ सिंह यांचं विरोधकांना प्रत्युत्तर
2 “लोकशाहीला लाज…,” राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका
3 कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांमध्ये असंतोष, राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन; पोलिसांकडून बळाचा वापर
Just Now!
X