28 November 2020

News Flash

“तुम्ही निःपक्षपाती असाल अशी अपेक्षा,” पायलट यांच्याकडून काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांना शुभेच्छा

सचिन पायलट यांच्या जागी काँग्रेसने नियुक्त केले नवे प्रदेशाध्यक्ष

संग्रहित

राजस्थानमध्ये बंड पुकारुन राज्य सरकारसमोर अस्थिरतेचे संकट निर्माण कऱणारे माजी मुख्यमंत्री सचिन पायलट यांनी राजस्थानमधील काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष निःपक्षपाती असतील आणि पक्षाला राज्यात सरकार स्थापन करण्यात मोलाची भूमिका निभावणाऱ्या कार्यकर्त्यांची काळजी घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सचिन पायलट यांनी ट्विट करत गोविंद सिंग दोस्तारा यांना प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

“राजस्थान काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्विकारल्याबद्दल गोविंद सिंग दोस्तारा यांना शुभेच्छा. कोणत्याही दबावात न येता ते काम करतील अशी अपेक्षा. तसंच निःपक्षपातीपणे काम करत राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी मेहनत घेतलेल्या काँग्रेस कार्यकर्त्याचा सन्मान राखतील अशी मला आशा आहे,” असं ट्विट सचिन पायलट यांनी केलं आहे.

गोविंद सिंग दोस्तारा यांनी बुधवारी प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. बंड पुकारल्यानंतर सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री तसंच प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. २०१८ मध्ये विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर सचिन पायलट यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र पक्षविरोधी कारवाई करत असल्याच्या आरोपाखाली त्यांना पदावरुन हटवण्यात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 7:16 pm

Web Title: sachin pilot says hope rajasthan congress chief govind singh dotasra is unbiased sgy 87
Next Stories
1 देशाचं नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर, दहावी-बारावी बोर्डाचं महत्त्व कमी; अनेक महत्त्वाचे बदल
2 Corona: रुग्णालयाचं बिलं पाहून अवाक झालेल्या उद्योजकाने ऑफिसचं कोविड रुग्णालयात केलं रुपांतर, गरीबांना मोफत उपचार
3 नरेंद्र मोदींनी संस्कृत श्लोक ट्विट करत केलं राफेलचं स्वागतम्
Just Now!
X