रंगपंचमीच्या दिवशीच मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. मागील १८ वर्षांपासून काँग्रेसमध्ये असणारे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेसने ज्योतिरादित्य यांचा राजीनामा स्वीकारला असून ते लवकरच भाजपामध्ये जाहीर प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना समर्थ देणाऱ्या काँग्रेसच्या १९ आमदारांनी राजीनामे दिले असून यामध्ये कमलनाथ सरकारमधील सहा मंत्र्यांचा समावेश आहे. यामुळे आता मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार कोसळणार असल्याचे बोलले जात आहे.

एकीकडे मध्य प्रदेश आणि दिल्लीमध्ये राजकीय खलबते शिजत असतानाच ट्विटवर मात्र चर्चा राजस्थानच्या उप-मुख्यमंत्र्यांची म्हणजेच सचिन पायलट यांची सुरु आहे. ज्योतिरादित्य शिंदे पाठोपाठ सचिन पायलटही काँग्रेसला रामराम ठोकून भाजपामध्ये प्रवेश करतील का यावरुन सोशल नेटवर्किंगवर जोरदार चर्चा सुरु आहे. ‘सचिन पायलट’ या टॉपिकवर मागील काही तासांमध्ये सात हजार ५०० हून अधिक ट्विट करण्यात आले आहेत. तर #sachinpilot या हॅशटॅगवर दिड हजारहून अधिक लोकांनी ट्विट केले आहेत.

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसने विजय मिळवल्यानंतर या राज्यांची धुरा तरुण नेत्यांच्या हाती देण्यात येईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाने दोन्ही राज्यांमधील मुख्यमंत्रीपदाची माळ गांधी कुटुंबाशी एकनिष्ठ असणाऱ्या नेत्यांच्या गळ्यात घातली. त्यामुळेच हे मध्य प्रदेशमधील ज्योतिरादित्य शिंदे आणि राजस्थानमध्ये सचिन पायलट नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगताना दिसली. मध्य प्रदेशमध्ये तर कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी अनेकदा हस्ताक्षेप करत ज्योतिरादित्य यांना सत्तेपासून आणि राज्यातील काँग्रेसच्या मुख्य कारभारापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न केले. त्यामुळेच अनेक विषयांवर ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधी भूमिका मांडल्याचे मागील काही काळापासून पहायला मिळालं आहे. याच नाराजीमुळे आता शिंदे यांनी थेट भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. शिंदे यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याआधी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधीकडे राजीनामा सोपवला आहे. मात्र त्याआधी सोमवारी संध्याकाळी त्यांनी सचिन पायलट यांची भेट घेतली. त्यानंतर पायलट यांनी ट्विटरुन ट्विट करुन मध्य प्रदेशमधील काँग्रेस पक्षात सुरु असणारा संघर्ष लवकरच संपेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

मात्र आज सकाळी शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना समर्थन देणाऱ्या काँग्रेसच्या १९ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळेच आता सचिन पायलटही असेच काहीतरी करणार का यावरुन चर्चा रंगू लागल्या आहेत. ही पाहा सचिन पायलट यांच्यासंदर्भात काही व्हायरल झालेली ट्विट…

तरुण नेते भाजपाच्या निशाण्यावर

एक व्हायरल मीम

राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

आणखीन एक व्हायरल मीम

पाच ट्रेण्डींग हॅशटॅग

पुढचं कोण?

तुम्ही पण निघा

आता सचिन पायलट

त्यांना कधी समजणार?

दुसरा नेताही जाणार?

आणि पुन्हा एक मिम…

सचिन पायलट यांच्या नावाची सोशल नेटवर्किगवर जोरदार चर्चा असली तरी मध्य प्रदेशमधील राजीनामा नाट्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. त्यामुळे आता ज्योतिरादित्यंसारखा जवळचा मित्र आणि सहकारी पक्ष सोडून गेल्यानंतर पायलट काय बोलतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.