भारताचा माजी मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरने शुक्रवारी ट्विटरवरून ब्रिटीश एअरवेज या विमान कंपनीच्या सेवेबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी सचिनने ब्रिटीश एअरवेजकडून मिळालेल्या वागणुकीबद्दल चीड आणि संताप व्यक्त केला. विमानात जागा उपलब्ध असूनही कुटुंबियांची तिकीट कन्फर्म न झाल्याचे सांगत सचिनने #BAdserviceBA या टॅगद्वारे ब्रिटीश एअरवेजच्या प्रशासनावर निशाणा साधला.