News Flash

‘कोल्डप्ले’च्या मैदानातून सचिनने दिला स्वच्छतेचा संदेश

सचिनने तरुणांना स्वच्छतेचा कानमंत्र दिला आहे.

सचिन तेंडुलकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (छाया सौजन्य ट्विटर)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ग्लोबल सिटीझनच्या ममैदानाती तरुणाईला स्वच्छतेचा संदेश दिल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही या व्यासपीठावरुन स्वच्छतेचा संदेश दिला.  देशात अस्वच्छतेमुळे संसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढल्याचे सांगत अस्वच्छतेविरोधातील  सामना आपण सर्वांनी मिळून जिंकायचा आहे. असे आवाहन सचिनने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या  ‘ग्लोबल सिटीझन’ महोत्सवादरम्यान तरुणाईला केले.

तरुणाईला स्वच्छतेचे महत्व पटवून देताना अस्वच्छतेविरोधातील लढा  तीव्र करण्याची गरज असल्याचे सचिनने म्हटले आहे. काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे तसेच शौचाला जाऊन आल्यानंतरही हात स्वच्छ करणे, या सामान्य वाटणाऱ्या गोष्टीवर भर देत  सचिनने तरुणांना स्वच्छतेचा कानमंत्र दिला.  देशोदेशीच्या समस्यांचा विचार करून त्या देशांमध्ये सामाजिक मोहीम राबविणाऱ्या ‘ग्लोबल सिटिझन’ या संस्थेसोबत सुरेल प्रवास करणारा ‘कोल्डप्ले’ हा बँडने शनिवारी मुंबईत भारतातील पहिला कार्यक्रम सादर केला.

या कार्यक्रमाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओ ककॉन्फरन्सिंगच्या भाषणाने करण्यात आली.  ‘ग्लोबल सिटीझन’ ममहोत्सवाच्या कार्यक्रमात  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सहभागी झाले होते. येत्या दोन वर्षात महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात केला. कुपोषणाच्या समस्येविरोधात आमचा लढा सुरू राहिल, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गंभीर समस्यांपैकी एक असलेल्या कुपोषणावरही भाष्य केले.

जगाला वेड लावणाऱ्या या बँडने मुंबईच्या पाश्चात्य संगीतप्रेमींमध्येही उत्साहाची लाट दिसत आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी बॉलिवू़मधील तारकांनीही आवर्जून हजेरी लावली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 10:47 pm

Web Title: sachin tendulkar talk on global citizen platform
Next Stories
1 खांद्याला खांदा लावून देशातील सफाई करु, मोदींचे तरुणाईला आवाहन
2 नोटांच्या मंदीमुळे ‘त्या’ व्यक्तिला बँकेने दिली तब्बल २० हजारांची चिल्लर
3 काश्मीर खोऱ्यातील जनजीवन तब्बल चार महिन्यानंतर पूर्वपदावर
Just Now!
X