इंदूर : ‘यज्ञ’ ही पर्यावरण शुद्ध करण्याची प्राचीन पद्धत असून, महासाथीपासून सुटका करून घेण्यासाठी ही परंपरा युगायुगांपासून सुरू आहे, असा दावा मध्य प्रदेशच्या सांस्कृतिकमंत्री उषा ठाकूर यांनी केला आहे. सध्या करोनाची दुसरी लाट सुरू असताना लोकांनी एकवेळा हवन करावे, असे आवाहन ठाकूर यांनी मंगळवारी लोकांना केले होते.

‘सर्वांनी यज्ञ करून त्यात आहुती अर्पण करावी आणि पर्यावरण शुद्ध करावे असे आम्ही आवाहन करतो.  ‘यज्ञ’ ही पर्यावरण शुद्ध करण्यासाठीची पद्धत असून धर्मांधता किंवा केवळ परंपरा नाही, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे आपण सर्वांनी यज्ञात प्रत्येकी २ आहुती देऊन पर्यावरण शुद्ध करायला हवे. मग करोनाची तिसरी लाट आपल्या देशाला स्पर्शही करू शकणार नाही’, असे ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले.