News Flash

सद्गुरूंची चित्राच्या माध्यमातून बैलाला श्रद्धांजली; लिलावात पाच कोटींची बोली

लिलावातून मिळालेल्या पैशांचा वापर सामाजिक कार्यासाठी केला जाणार

इशा फाऊंडेशनचे संस्थापक व अध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव यांनी काढलेल्या एका चित्राचा ऑनलाइन लिलाव तब्बल ५ कोटी रुपयांमध्ये झाला. जवळपास एक महिन्यापूर्वी हे चित्र त्यांनी ऑनलाइन लिलावासाठी ठेवलं होतं. अखेर सोमवारी हा लिलाव बंद झाला आणि चित्रावर शेवटची बोली ५.१ कोटी रुपयांची लागली. लिलावातून मिळालेल्या या पैशांचा वापर इशा फाऊंडेशनच्या विविध सामाजिक कामांसाठी केला जाणार आहे.

याआधी जग्गी वासुदेव यांनी काढलेल्या एका चित्राचा लिलाव ४ कोटी रुपयांना झाला. ही रक्कम त्यांनी ‘बीट द व्हायरस’ नावाच्या संस्थेला दान केली. या पैशांचा वापर करोना व्हायरसविरुद्ध लढणाऱ्यांना आवश्यक त्या गोष्टी व ग्रामीण भागातील गरीब लोकांना जेवण पुरवण्यासाठी केला जाणार आहे.

‘भैरव’ बैलाचं चित्र
जग्गी वासुदेव यांनी इशा फाऊंडेशनच्या ‘भैरव’ नावाच्या बैलाचं चित्र रेखाटलं होतं. एप्रिल महिन्यात या बैलाचा मृत्यू झाला होता. त्याच्याच आठवणीत त्यांनी हे चित्र रेखाटलं होतं. गाईचं शेण, कोळसा, हळद, चुना या गोष्टींचा वापर करत हे चित्र रेखाटण्यात आलं आहे. सद्गुरुंनी ट्विट करत हे चित्र विकलं गेल्याची माहिती दिली.

‘भैरवने (बैल) त्याचं घर शोधलंय. आमचा प्रिय बैल मृत्यूनंतर लोकांची सेवा करत आहे. चित्र विकत घेतलेल्याचं उदार मन आमच्या स्वयंसेवकांना ग्रामीण भागातील लोकांची मदत करण्यासाठी प्रेरित करेल’, असं ट्विट त्यांनी केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 10:03 am

Web Title: sadhguru painting of bull bhairava fetches rs 5 cr at online auction ssv 92
Next Stories
1 धक्कादायक! पगार मागितला म्हणून मालकीणीने कर्मचाऱ्याच्या अंगावर सोडला कुत्रा, तोंडावर १५ टाके
2 ICICI बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’, करोना संकटात काम केल्याचं मिळालं मोठं ‘गिफ्ट’
3 उत्तराखंडच्या पर्यटनमंत्र्यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना पाठवलं ‘रामायण’; म्हणाले…
Just Now!
X