जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे आठ वर्षाच्या चिमुरडीची बलात्कार करुन हत्या करण्यात आल्यानंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना साध्वी प्रज्ञा यांनी मात्र वादग्रस्त वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. कठुआ बलात्कार झालाच नाही, हे तर राजकीय षडयंत्र आहे असं वक्तव्य साध्वी प्रज्ञा यांनी केलं आहे.
‘कठुआ बलात्कार एक असं षडयंत्र आहे, जे ऐकून मनात एका विशेष जातीवर्गासाठी घृणा निर्माण होते. हा वर्ग आहे मुस्लीम, काँग्रेस आणि डावे आहेत. त्या मुलीबोसबत बलात्कार झालाच नाहीये हे मेडिकल आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतोय. फक्त तिची हत्या झालीये तीपण कोणी केलीये माहिती नाही. पण बलात्कारासारखा आरोप करत एका हिंदूला अडकवलं जातं. यापेक्षा बीभत्स राजकीय षडयंत्र असूच शकत नाही’, असं त्यांनी म्हटलं आहे.
‘मुलीवर बलात्कार झालाच नाही. मुलीची हत्या कोणी केली याकडे कोणाचं लक्षच गेलं नाही. ज्या मुलीवर बलात्कार झाला नाही तिच्यावर बलात्कार झालाय म्हणून आरडाओरड करण्यात आली. काँग्रेसने, डाव्यांनी, मुस्लीमांनी मृत्यूनंतर तिचा बलात्कार केला. मृत्यूनंतरही तिच्या आत्म्याला शांतता मिळाली नाही’, असंही त्या यावेळी बोलल्या आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 23, 2018 1:54 pm