News Flash

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर जे पी नड्डांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

"पश्चिम बंगालमधील अराजकता आणि असहिष्णुता संपवावी लागेल"

पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर विटा आणि दगडांनी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात भाजपाचे काही नेते जखमी झाल्याचा आरोप पक्षाने केला आहे. ममता बॅनर्जी सरकारच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचा आरोप यावेळी भाजपा नेत्यांनी केली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यासंबंधी अहवाल मागवला आहे.

भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला; कारवर तुफान दगडफेक

जे पी नड्डा यांच्या ताफ्यातील कारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला असून यामध्ये कारवर विटा आणि दगडांनी हल्ला करत काचा फोडल्याचं दिसत आहे. हल्ल्यात पक्षाचे नेते मुकूल रॉय आणि कैलाश विजयवर्गीय जखमी झाल्याचं जे पी नड्डा यांनी सांगितलं आहे. भाजपा नेते कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

हल्ल्यावर जे पी नड्डा यांनी सभेत बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली असून म्हटलं आहे की, “आज झालेल्या हल्ल्यात मुकूल रॉय आणि कैलाश विजयवर्गीय जखमी झाले आहेत. लोकशाहीसाठी ही लज्जास्पद घटना आहे. ताफ्यात हल्ला झाला नाही अशी कोणतीही कार नाही. मी बुलेटप्रूफ कारमध्ये होतो म्हणून सुरक्षित आहेत. पश्चिम बंगालमधील अराजकता आणि असहिष्णुता संपवावी लागेल”. “जर मी आज या बैठकीत पोहोचलो आहे तर ते देवी दुर्गाच्या आशीर्वादानेच,” असंही यावेळी ते म्हणाले.

यावेळी कैलाश विजयवर्गीय यांनीदेखील आपण जखमी झाल्याचं सांगितलं आहे. “हल्ल्यात मी जखमी झालो आहे. पक्षाध्यक्षही कारमध्ये होते. आम्ही हल्ल्याचा निषेध करतो. पोलिसांच्या उपस्थितीत गुंडांनी हल्ला केला. आम्ही आपल्या देशात आहोत असं वाटतच नव्हतं,” असं ते म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 3:52 pm

Web Title: safe because i was in bullet proof car says bjp chief jp nadda in bengal sgy 87
Next Stories
1 यूपीएची ‘पॉवर’फूल खेळी… सोनिया गांधींच्या जागी शरद पवारांना मिळणार अध्यक्षपद?
2 “आपली धोरणं आणि राजकारण वेगळं असू शकतं, मात्र…”; मोदींनी करुन दिली आठवण
3 आताच्या संसद भवनाने मूलभूत गरजा पूर्ण केल्या नवी संसद भारताच्या महत्वाकांक्षा पूर्ण करणार : पंतप्रधान मोदी
Just Now!
X