27 February 2021

News Flash

आंबेडकरांच्या पुतळ्याचं पुन्हा भगवीकरण, भाजपा नेत्याचा सहभाग

उत्तर प्रदेशातील टांडा येथे भाजपा आमदाराने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून भगवे कपडे घातल्याचं समोर आलं आहे

पोटनिवडणुकांमध्ये झालेला पराभव अद्यापही पचवू न शकलेल्या भाजपाने आता एक नवा वाद निर्माण केला असून यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील टांडा येथे भाजपा आमदाराने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून भगवे कपडे घातल्याचं समोर आलं आहे. टांडा येथील भाजपा आमदार संजू देवी आणि कार्यकर्त्यांनी थिरुआ परिसरात असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आधी दुधाचा अभिषेक घातला आणि नंतर चंदनाचा टीका लावून भगवे कपडे घालण्यात आले. मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हे करण्यात आल्याचं भाजपा आमदाराने सांगितलं आहे.

आंबेडकरांच्या पुतळ्याला भगवे कपडे घालण्यात आले असल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याआधी उत्तर प्रदेशच्या बदायू येथे अशी घटना घडली होती, ज्यानंतर वाद निर्माण झाला होता. एप्रिल महिन्यात बदायू येथेही बाबासाहेबांच्या पुतळ्याला भगवा रंग देण्यात आला होता. यावर दलितांनी आक्षेप घेत पुतळ्याला पुन्हा निळा रंग दिला होता.

दलित नेत्यांनी घटनेवर नाराजी व्यक्त करत भाजपा सरकार इमारतींना भगवा रंग दिल्यानंतर आता आंबेडकरांच्या पुतळ्यालाही भगवा रंग देत आहे, हे अजिबात स्विकारलं जाऊ शकत नाही असं म्हटलं होतं. जर लवकरात लवकर पुतळ्याला निळा रंग दिला गेला नाही तर जिल्हा प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल अशी धमकी देण्यात आली होती. यानंतर तात्काळ पुतळ्याला निळा रंग देण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 3:55 pm

Web Title: saffron cloths put on ambedkar statue in up
Next Stories
1 …तर पेट्रोल डिझेलचे दर ७ ते ८ रुपयांनी कमी होतील-गडकरी
2 अब की बार महंगाई की मार! आता अनुदानित सिलिंडरही महागले
3 जम्मू काश्मीर हाय अलर्टवर, २० दहशतवाद्यांची घुसखोरी; हल्ल्याची शक्यता
Just Now!
X