छत्रसाल स्टेडियममध्ये कुस्तीपटू सागर धनकड याच्या हत्येचा उलगडा होऊ लागला आहे. कुस्तीपटू सुशील कुमार याला अटक केल्यानंतर त्याच्यासोबत कटात सहभागी असलेल्या लोकांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात झाली आहे. नीरज बवाना गँगच्या ४ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घटनेच्या दिवशी नीरज बवाना गँगचे गुंड तिथे उपस्थित होते. त्यांच्या मदतीने सुशील कुमारनं सागर धनकड काटा काढला होता. सागर धनकड याचा मृत्यू ४ मे रोजी झाला होता.

भूपेंद्र उर्फ भूपी (३८), मोहित ऊर्फ भोली (२२), गुलाब अका पेहलवान (२४) आणि मंजीत उर्फ चुन्नी (२९) अशी अटक केलेल्या चौघांची नावं आहेत. हे चारही जण हरयाणात राहाणारे आहेत. तसेच काला असौदा नीरज बवाना गँगचे हे सक्रिय सदस्य आहेत. दिल्लीतील कंझावला भागातून त्यांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली आहे. पोलिसांना चार जणांची माहिती मिळाली होती. हे चार जण सागर धनकड हत्येत सहभागी असल्याचं पक्की खबर देण्यात आली होती. तसेच घेवरा गावात एका साथीदाराला भेटण्यासाठी येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि चौघांन बेड्या ठोकल्या.

Sexual assault case : तरूण तेजपाल यांच्या निर्दोषत्वाला गोवा सरकारकडून उच्च न्यायालयात आव्हान!

काय आहे प्रकरण?

भांडण मॉडेल टाउन भागात असलेल्या एका संपत्तीवरून झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सागर मित्रांसोबत ज्या प्लॅटमध्ये राहात होता. तो फ्लॅट रिकामी करण्यासाठी सुशील कुमार त्यांच्यावर दबाव टाकत होता. सागरचे मित्र सोनू आणि अमित कुमार ४ मे रोजी घटनास्थळी होते. तेव्हा सुशील कुमार आणि अन्य साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.