03 March 2021

News Flash

पैसे न भरल्यास सहाराच्या अॅम्बी व्हॅलीचा लिलाव; सुप्रीम कोर्टाचा सुब्रतो रॉय यांना दणका

पैसे भरण्याचा कालावधी वाढवून देण्यास कोर्टाचा नकार

सुब्रतो रॉय (संग्रहित चित्र)

गुंतवणूकदारांचे पैसे बुडवणाऱ्या सुब्रतो रॉय यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. तुम्हाला आधीपासूनच पुरेसा वेळ देण्यात आला होता. दिलेल्या कालावधीत पैसे भरले नाही तर अॅम्बी व्हॅली प्रकल्पाचा लिलाव केला जाईल असे खडसावून सांगत सुप्रीम कोर्टाने सुब्रतो रॉय यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे.

सहारा समुहाने १३ एप्रिलपर्यंत सेबीकडे ५,०९२ कोटी रुपये जमा करावे असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. मात्र सुप्रीम कोर्टाने आणखी वेळ द्यावा अशी विनंती सहारा समुहाने सुप्रीम कोर्टाकडे केली होती. गुरुवारी या याचिकेवर सुनावणी झाली. सहारा समुहाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. आता पैसे भरण्यासाठी दिलेल्या कालावधीत आणखी वाढ करणार नाही असे कोर्टाने स्पष्ट केले.

महिनाभरापूर्वी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत सहारा समुहाने लिलावासाठी १५ मालमत्तांची यादी दिली होती. यातील १३ मालमत्ता विकून पाच हजार कोची रुपये मिळू शकतील असे सहाराचे म्हणणे होते. पैसे जमा न केल्यास सहारा समुहाच्या लोणावळा येतील अॅम्बी व्हॅलीचा लिलाव होण्याची शक्यता आहे.

समभागधारकांचे २४,००० कोटी रुपये परत करावे यासाठी सेबीने न्यायालयामध्ये सुब्रतो रॉयविरोधात धाव घेतली होती. मार्च २०१४ मध्ये पहिल्यांदाच सुब्रतो रॉयला अटक करण्यात आली होती. छोट्या गुंतवणूकदारांना खोटे बाँड विकून रॉय यांनी हजारो कोटी रुपये कमवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. गुंतवणूकदारांची रक्कम सर्वोच्च न्यायालयाच्या निबंधकाच्या खात्यामध्ये जमा करण्याऐवजी सेबी-सहाराच्या खात्यात ती जमा करावी, असा आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 4:29 pm

Web Title: sahara supreme court aamby valley pay 5000 crore to recover dues subrata roy
Next Stories
1 मोदी सरकारच्या निशाण्यावर नोकरशाह; आयएएस, आयएफसएस अधिकाऱ्यांच्या घरावर छापे
2 ‘बाबरी’ प्रकरणी अडवाणींसह भाजप नेत्यांवर खटला चालवावा; सीबीआयची सुप्रीम कोर्टाकडे मागणी
3 …तर मुंबईतून एकही विमान उडू देणार नाही; शिवसेना खासदारांचा इशारा
Just Now!
X