उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु, या सूचनेच्या नावावरून धमकावण्याचे प्रकार केले जात असल्याचे चित्रही दिसत असल्याचे सहारनपूर जिल्ह्यातून समोर आले आहे. सहारनपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एका अधिकाऱ्याला कामात निष्काळजीपणा दाखवल्यास तुमचा गळा कापण्यात येईल, अशी धमकी दिली. हा धमकीचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांत व्हायरल झाला आहे.

व्हिडिओत सहारनपूरचे जिल्हाधिकारी पी के पांडेय त्यांच्या जवळ उभ्या असलेल्या असलेल्या अधिकाऱ्यावर चिडलेले दिसतात. कोणतं तरी हत्यारच असणार, ज्याने या सर्व गोष्टी लिहिल्या.. तुम्हाला तर वेळच नाहीये.. त्यानंतर पांडे तिथे उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याला म्हणतात की, तुम्ही तुमच्या क्षेत्राचे निरीक्षण करत नाही का? तुम्हाला निरीक्षण करण्याचा अधिकार आहे. इतकेच नव्हे तर कामात निष्काळजीपणा केल्यामुळे पंचायत समितीच्या अधिकाऱ्याला फटकारत आम्ही तुमचा गळा कापू, असे म्हटले. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.