17 January 2021

News Flash

‘डॉक्टर सैफ’ काश्मीरमधील हिजबुल मुजाहिद्दीनचा नवीन कमांडर, रियाझ नायकूची घेणार जागा

मागच्या आठवडयात सुरक्षा दलांनी एन्काऊंटरमध्ये रियाझ नायकूचा खात्मा करुन हिजबुल मुजाहिद्दीनचे कबंरडे मोडून टाकले.

सैफुल्लाह मीर उर्फ गाझी हैदर काश्मीरमधील हिजबुल मुजाहिद्दीनचा नवीन कमांडर बनला आहे. तो रियाझ नायकूची जागा घेणार आहे. गाझी हैदर काश्मीरमधील दहशतवादाचा नवीन चेहरा असणार आहे. मागच्या आठवडयात सुरक्षा दलांनी एन्काऊंटरमध्ये रियाझ नायकूचा खात्मा करुन हिजबुल मुजाहिद्दीनचे कबंरडे मोडून टाकले. त्याच्याजागी आता गाझी हैदरची नियुक्ती करण्यात आली आहे.

सहावर्षांपूर्वी रियाझ नायकूनेच गाझी हैदरला हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये आणले होते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचे मुख्यालय आहे. या दहशतवादी संघटनेचा प्रवक्ता सलीम हाश्मीने गाझी हैदरला काश्मीरमधील हिजबुलचा कमांडर बनवण्यात येत असल्याची घोषणा केली. त्याशिवाय झफरुल इस्लामची डेप्युटी ऑपरेशनल कमांडर तर अबू तारीक भाईची मुख्य लष्करी सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे.

मागच्या आठवडयात २१ राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या ऑपरेशनमध्ये नायकू आणि आदील अहमदचा खात्मा करण्यात आला होता. गाझी हैदर डॉक्टर सैफ म्हणूनही ओळखला जातो. कारण जखमी दहशतवाद्यांवर त्याने उपचार केले आहेत. सैफुल्लाह मीरचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. शाळा पूर्ण केल्यानंतर त्याने व्यावसायिक शिक्षण घेतले. पुलवामामध्ये आयटीआयमध्ये बायो मेडिकल कोर्स पूर्ण केला. त्यानंतर श्रीनगरमध्ये टेक्निशिअन म्हणून त्यान नोकरी सुद्धा केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 12:17 pm

Web Title: saifullah mir aka ghazi haider is hizbuls new face of terror in kashmir dmp 82
Next Stories
1 टाटा ग्रुपच्या कर्मचाऱ्यांनाही बसणार लॉकडाउनचा फटका; व्यवस्थापन घेऊ शकतं ‘हा’ मोठा निर्णय
2 माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर
3 भारताच्या यशस्वी ‘सिक्रेट मिशन’ची २२ वर्ष
Just Now!
X