03 June 2020

News Flash

‘फुल’राणीकडून पंतप्रधानांना वाढदिवसाची खास भेट

भारताची 'फुल'राणी सायना नेहवालने पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी भेट दिली.

भारताची ‘फुल’राणी सायना नेहवालने पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी भेट दिली. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सायनाने वापरलेले रॅकेट तिने नरेंद्र मोदींना भेट म्हणून दिले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सायनाने रौप्य पदकाची कमाई केली होती. या स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारी सायना पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली होती.

मोदींचा आज ६५ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने सायनाने बुधवारी नवी दिल्लीत नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सायनाने दिलेल्या अनोख्या गिफ्टबद्दल मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर तिचे आभार व्यक्त केले. तर, पंतप्रधानांच्या भेटीमुळे आणि त्यांना माझे रॅकेट भेट म्हणून देऊ शकले याचा आनंद सायनाने व्यक्त केला आहे. मोदींच्या भेटीवेळी सायनासोबत तिचे वडिल हरवीर नेहवाल आणि आयओएस स्पोर्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीरव तोमर देखील उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2015 12:53 pm

Web Title: saina nehwal gifts her badminton racquet to pm narendra modi
टॅग Saina Nehwal
Next Stories
1 राष्ट्रीय खुली मैदानी स्पर्धा : मनप्रीत ऑलिम्पिकसाठी पात्र
2 युएफा चॅम्पियन्स लीग : ‘युनायटेड’चे वेदनादायी पुनरागमन!
3 सरदार, रुपिंदर पालसाठी चढाओढ
Just Now!
X