12 July 2020

News Flash

लष्कर ए तोयबाचा दहशतवादी पकडला

जम्मू-काश्मीर पोलिसांना बारामुल्ला भागातील कारवाईत यश

जम्मू-काश्मीर पोलिसांना दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाच्या एका दहशतवाद्यास अटक करण्यात यश आले आहे. बारामुल्ला भागात १९ वर्षीय शाजिद फारुख डार या दहशतवाद्यास पकडण्यात आले आहे.

या अगोदर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस जवानांनी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या कारी यासीरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. भारतीय जवानांचे हे देखील मोठे यश होते. या कारवाईत ठार करण्यात आलेला यासीर हा मागील वर्षी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी होता. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांचा मृत्यू झाला होता.

याशिवाय, जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्य़ात सुरक्षा दलांशी चकमकीत मारला गेलेला दहशतवादी हा जैश ए महंमदचा सदस्य व पाकिस्तानी नागरिक होता, तसेच तो अनेक गुन्ह्य़ात पोलिसांना हवा होता, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अबु सैफुल्ला व अबू कासिम या टोपण नावाने तो कारवाया करीत होता. दक्षिण काश्मीरमधील दहशतवादग्रस्त भागात गेले दीडवर्ष तो कारवाया करीत होता. सैफुल्ला हा अपहरण व दोन नागरिकांच्या हत्येप्रकरणी हवा होता. त्याने पोलिस अधिकारी व स्थलांतरित कामगारांना धमक्याही दिल्या होत्या. जैश ए महंमदचा पाकिस्तानातील प्रमुख कमांडर कारी यासीर याचा तो निकटचा साथीदार होता. यासीर हा जुलै २०१३ मध्ये कुपवाडा जिल्ह्य़ात मारला गेला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2020 1:20 pm

Web Title: sajid farooq dar affiliated with proscribed terror outfit lashkar e taiba was arrested msr 87
Next Stories
1 “शाहीन बागच्या आंदोलनात सहभागी हो आणि बिर्याणी खा”; केरळच्या बेरोजगार तरुणाला आला ई-मेल
2 भारतीय हद्दीत घुसखोरी करणारे पाकिस्तानी ड्रोन बीएसएफने पाडले
3 CAA विरोधी आंदोलनासाठी कट्टर मुस्लीम संघटनेकडून अर्थसहाय्य – ईडी
Just Now!
X