साक्षी महाराज यांचे वादग्रस्त वक्तव्य, ‘राममंदिर होणारच ’

वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चच्रेत राहणारे भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा नवे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. देशातील मुस्लिमांची डीएनए चाचणी केली, तर ते िहदूच असल्याचे दिसून येईल. पण देशातील काही राजकीय नेते मुस्लिमांची दिशाभूल करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत, असा आरोप साक्षी महाराज यांनी केला.

मेरठमध्ये संत संमेलनात बोलताना साक्षी महाराज यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. ते महणाले, मुस्लिमांची डीएनए चाचणी केली तर ते िहदूच असल्याचे आढळून येईल. पण समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे सर्वजण मुस्लिमांना भरकटवण्याचे काम करीत आहेत. बिहारच्या निवडणुकीपूर्वी असहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित करून काही जणांनी पुरस्कारवापसी केली होती. आता निवडणुकीच्या निकालांनंतर ते सर्वजण कुठे गेले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

केंद्र सरकार २०१९ पर्यंतच अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे काम करेल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तिथे राम मंदिर उभारण्यात यावे, यासाठी मध्य प्रदेशातील सहा लाख मुस्लिमांनी स्वाक्षरया केल्या आहेत, असेही साक्षी महाराज म्हणाले.