बिहारमधील विधानसभा निवडणुकीचं वारं हळूहळू तापू लागलंय. एकीकडे सभामधून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केला जात असताना दुसरीकडे प्रचारसािहत्याच्या माध्यमातूनही एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे. याआधी झालेल्या महाराष्ट्र , दिल्ली, हिमाचल प्रदेश या निवडणुकांमध्ये सर्वांचे लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच होते. आता बिहारही याला अपवाद नाही.
मोदी येत्या २ ऑक्टोबरला गांधी जयंती दिनी बिहारमधील बांका जिल्ह्यात जाहीर सभा घेणार आहेत. त्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात येते आहे.  या सभेच्या पार्श्वभूमीवर मोदी वापरतात त्यासाऱख्या जॅकेट्सना सध्या तिथे मोठी मागणी आहे. बांका जिल्ह्यामध्ये या जॅकेटचा खप अचानक वाढला असल्याचे स्थािनक माध्यमांनी म्हटले आहे.
आतापर्यंत निवडणुकीच्या काळात तरूणाईच अशा वस्तू विकत घेत असल्याचे इतर राज्यांमध्ये दिसले होते. पण बिहारमध्ये सगळ्याच वयोगटातील लोकांकडून या जॅकेटला मागणी मिळू लागलीये. हॅण्डलूम सिल्क, खादी मिश्रित सिल्क आिण सिनन या कापड प्रकारातील जॅकेट्सना मोठी मागणी आहे.
मागणी वाढल्यामुळे अनेक दुकानदारांनी या जॅकेट्सचा मोठा साठा जमवून ठेवला असल्याचीही मािहती मिळाली आहे.