सेक्स या विषयावर खुलेपणानं बोलणं आजही आपल्या समाजात निषिद्ध मानलं जातं. पण करोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाउन झाल्यापासून देशामध्ये सेक्स टॉइजच्या विक्रीमध्ये तब्बल ६५ टक्के वाढ झाली आहे. भारतीय बाजारात कुठल्या सेक्स प्रोडक्टना मागणी आहे? ग्राहकांचा कल काय? या विषयी ThatsPersonal.com च्या ‘इंडिया अनकवर्ड: इन साइटफुल एनलिसिस ऑफ सेक्स प्रोडक्ट्स ट्रेंड्स इन इंडिया’ रिपोर्टमध्ये विश्लेषण करण्यात आले आहे.
२.२ कोटी व्हिजिटर्स आणि ३ लाख ३५ हजार उत्पादनांची ऑनलाइन झालेली विक्री या आधारावर सर्वेच्या चौथ्या आवृत्तीत हे विश्लेषण करण्यात आले आहे. सेक्स प्रोडक्टच्या या खरेदीमध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. त्याखालोखाल कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांचा क्रमांक येतो. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.
मोठया महानगरांमध्ये सेक्स प्रोडक्टच्या विक्रीमध्ये मुंबई पहिल्या स्थानावर आहे. तर त्याखालोखाल बंगळुरु, दिल्लीचा क्रमांक येतो. दिल्ली एनसीआरच्या तुलनेत मुंबई महानगर प्रदेशात सेक्स प्रोडक्टची २४ टक्के जास्त विक्री झाली. सेक्स प्रोडक्टच्या खरेदीमध्ये पुणेही पहिल्या आठ शहरांमध्ये आहे. सूरत शहरात प्रति ऑर्डरमागे ३,९०० रुपये खर्च केले जातात. सर्व राज्यांमध्ये उत्तर प्रदेशात पुरुष सर्वाधिक सेक्स प्रोडक्टची खरेदी करतात.
इंटरनेटवर सर्फींगकरुन खरेदी करण्याचा जो कल आहे, त्यानुसार महिला दुपारी १२ ते ३ तर पुरुष रात्री नऊ ते मध्यरात्री पर्यंतच्या वेळेत खरेदी करतात असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. विजयवाडा, जमशेदपूर, बेळगाव आणि वडोदरा या शहरात पुरुषांपेक्षा महिला जास्त खरेदी करतात. सेक्स टॉइज खरेदी करणाऱ्यांमध्ये २५ ते ३४ वयोगटातला ग्राहकवर्ग जास्त आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2020 4:45 pm