News Flash

सलीम खान यांनी सलमानला घरात कोंडले पाहिजे- संजय राऊत

पाकिस्तानी कलाकार हे काही दहशतवादी नाहीत, ते कलाकार आहेत.

Shiv Sena : या देशात असे अनेक लोक आहेत ज्यांना कधी काय बोलायचे हे कळत नाही, असे सांगत राऊत यांनी सलमानवर हल्ला चढवला.

पाकिस्तानी कलाकारांची बाजू उचलून धरणाऱ्या सलमान खानवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे. सलीम खान यांनी सलमानला घरात कोंडले पाहिजे, असे राऊत यांनी सांगितले. ते शनिवारी गोव्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. सलमान खान काहीही बोलत आहे. त्यामुळे सलीम खान यांनी त्याला घरात कोंडून ठेवावे. त्यांच्या घरातील कोणी देशासाठी मेलेले नाही. यांच्या घरावर मोर्चे नेले तरी फरक पडत नाही, इतके हे निर्ढावलेले आहेत. या देशात असे अनेक लोक आहेत ज्यांना कधी काय बोलायचे हे कळत नाही, असे सांगत राऊत यांनी सलमानवर हल्ला चढवला.
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जावा, या मागणीचा विरोध करत सलमानने त्यांची बाजू उचलून धरली होती. पाकिस्तानी कलाकार हे काही दहशतवादी नाहीत, ते कलाकार आहेत. ते कलाकार अधिकृतपणे भारतात येतात. येथे काम करण्यासाठी लागणारा व्हिसा हा आपल्या सरकारकडूनच त्यांना दिला जातो. दहशतवादी आणि कलाकार यांच्यात फरक आहे. आपण दहशतवाद्यांना योग्य ते प्रत्युत्तर दिले आहे, असे सलमानने म्हटले होते. सलमानच्या या विधानानंतर शिवसेना आणि मनसेसह अन्य राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. भारतीय जवान सीमेवर आपल्यासाठी लढत आहेत. त्यांनी शस्त्रे खाली ठेवली तर सलमान सीमेवर जाऊन उभा राहणार आहे काय ? असा सवाल राज यांनी केला. भारतात एवढे कलाकार असताना सलमानला पाकिस्तानातील कलाकारांचा इतकाच पुळका येत असेल, तर त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकला पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2016 3:33 pm

Web Title: salim khan should put salman under house arrest sanjay raut
Next Stories
1 सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानमध्ये दहशत, पाकव्याप्त काश्मीरमधून ३०० अतिरेकी पळाले
2 ‘सर्जिकल स्ट्राईक’ रामदेवबाबांच्या सल्ल्याने झाला असेल तर देव देशाचे भले करो- दिग्विजय सिंह
3 अबु आझमींनी केली सलमानची पाठराखण, शिवसेनेवर साधला निशाणा
Just Now!
X