News Flash

VIDEO: जया प्रदा यांच्याबद्दल सपा नेत्याची अश्लील टिप्पणी

फिरोझ खाना यांनी एकेकाळी सहकारी राहिलेल्या जया प्रदा यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी केली आहे.

उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे नेते फिरोझ खान यांनी रामपूरमधील भाजपाच्या उमेदवार आणि अभिनेत्री जया प्रदा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना फिरोझ खाना यांनी एकेकाळी सहकारी राहिलेल्या जया प्रदा यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांच्या या वक्तव्याची दखल घेऊन त्यांना नोटीस बजावली आहे.

निवडणुकीचा हंगाम सुरु झाल्यानंतर रामपूरच्या संध्याकाळवर आता रंग चढेल. रामपूरचे लोक समजदार, हुशार आहेत काहीही झाले तरी मत मात्र ते समाजवादी पार्टीलाच देतील असे फिरोझ खान यांनी सांगितले. जया प्रदा यांना उद्देशून त्यांनी हे विधान केले. या विधानावरुन सोशल मीडियावर फिरोझ खान यांच्यावर मोठया प्रमाणावर टीका करण्यात आली.

सपा-बसपा आघाडीने रामपूरमधून आझम खान यांना उमेदवारी दिली आहे. फिरोझ खान आझम खान यांचे निकटवर्तीय समजले जातात. आझम खान आणि जया प्रदा परस्परांचे कट्टर विरोधक आहेत. जया प्रदा यांनी यापूर्वी सुद्धा आझम खान यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

फिरोझ खान एवढयावरच थांबले नाहीत त्यांनी भाजपाच्या दुसऱ्या महिला उमेदवार संघमित्रा मौर्यावरही भाष्य केले. गुंडांना घाबरु नका मी त्यापेक्षा मोठी गुंडी बनून तुमचे रक्षण करीन असे एकासभेत त्या म्हणाल्या. त्यावर फिरोझ खान यांनी आता कोणी स्वत:ला गुंडी म्हणेल, कोणी नाचण्याचे काम करेल. तो त्यांचा पेशा आहे असे फिरोझ खान म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2019 5:27 pm

Web Title: samajwadi leader sexist remark against jaya prada
Next Stories
1 लक्ष्मी मित्तल यांनी भावाला केली १ हजार ६०० कोटींची मदत
2 घराणेशाहीत काँग्रेसपेक्षा भाजपा वरचढ.. ही पहा उमेदवारांची यादी!
3 सुशीलकुमार शिंदे यांचे नाव दगडू; उमेदवारी अर्जावरील आक्षेप फेटाळला
Just Now!
X